पावसाळा माझा आवडता ऋतू मराठी | pavsala nibandh in marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण पावसाळा या ऋतु वर म्हणजेच माझा आवडता ऋतू पावसाळा यावर निबंध बघणार आहोत. pavsala nibandh in marathi या निबंधामध्ये पावसाळ्याचे अतिशय सुंदर वर्णन करण्यात आले आहे. माझा आवडता ऋतू पावसाळा हा निबंध वर्ग 1 ते 10 चे विद्यार्थी आपल्या अभ्यासासाठी वापरू शकता चला तर मग सुरु करूया पावसाळा निबंध मराठी.maza avadata rutu pavsala nibandh in marathi 


maza avadta rutu pavsala,pavsala nibandh in marathi ,maza avadata rutu pavsala marathi nibandh,maza avadta rutu pavsala essay in marathi language,
maza avadta rutu pavsala

माझा आवडता ऋतू पावसाळा यावर मराठी निबंध |pavsala nibandh in marathi

टीप या निबंधाचे शीर्षक पुढील प्रमाणे असू शकते.
 • pavsala nibandh in marathi
 • maza avadata rutu pavsala nibandh in marathi
 • माझा आवडता ऋतू पावसाळा यावर मराठी निबंध
 • पहिला पाऊस निबंध मराठी
 • पावसावर निबंध मराठी
 • पाऊस निबंध मराठी लेखन
 • माझा आवडता ऋतू पावसाळा यावर मराठी निबंध
 • पावसाळ्याचा निबंध

पावसाळा हा ऋतू सुरु झाला नि झाला की सर्वांच्या मनामध्ये अतिशय आनंद निर्माण होतो त्याच प्रमाणे माझ्या मनात ही सुद्धा अतिशय आनंद आणि आणि माझ्या शरीरात तर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कारण माझा सर्वात आवडता ऋतू हा पावसाळा आहे.

भारतामध्ये उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहे आणि त्यापैकी सर्वात आवडता आणि माझा जिवाभावाचा ऋतू म्हणजे पावसाळा हा होय.उन्हाळ्यामध्ये कडक उन्हात जीव कसा कासावीस होतो, गर्मी मुळे माझे हाल तर खूपच बेहाल होते. यामुळे कधी पावसाळा ऋतु हा सुरू होतो याचीच मी वाट बघत असतो.जसा उन्हाळा हा ऋतू संपत येतो आणि आकाशामध्ये काळे ढग दिसायला लागतात तेव्हा तेव्हा माझ्या खुशीचा ठिकाणाच नसतो.

मी आनंदाने पहिल्या पावसाची वाट बघत असतो,कधी पहिला कधी पाऊस येतो आणि कधी मी या पहिल्या पावसात नाचतो याची मला खुपच घाई झालेली असते. कारण हा माझा सर्वात आवडता ऋतू पावसाळा आहे.यामाझ्या घाईच्या मागे आणखी एक कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. या  हिरवळी मुळे जणु धरतीने आपल्या अंगावर तिहेरी शाल ओढून घेतलेली आहे असेच वाटते.

या हिरव्या शाली मुळे निसर्गसौंदर्य अतिशय उभरून येते. आणि यामुळे पृथ्वी अधिक सुंदर आणि मनमोहक वाटू लागते.पावसाळा मला आवडण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कडक उन्हाळा मधून गर्मी तून होणारी सुटका.

pavsala nibandh in marathi

पावसाळा माझ्याप्रमाणे अनेकांचा आवडता ऋतू असतो, कारण पावसाळ्यामुळे अनेकांच्या विविध समस्या दूर होतात. जसे की कडक उन्हाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खूप खोल कमी होऊन पाण्याची टंचाई म्हणजेच पाण्याचा दुष्काळ निर्माण होतो.आणि त्यांना पाणी आणण्याकरिता खूप कष्ट सहन करावे लागते.त्यांना पाणी आणण्याकरिता खूप दूर चालत जाऊन पाणी आणावे लागते. परंतु पावसाळ्यामुळे या सर्व समस्यांचे निराकरण होते. पावसाळायामुळे माझ्याबरोबर आणि शेतकरी सुद्धा खूप आनंदी होतो कारण

उन्हाळाभर शेतकरी हा आपले शेत स्वच्छ करून त्याची नागरणी करतो वखरणी करतो आणि पीक लावण्या कधी चा पावसाची वाट बघत आकाशाकडे डोळे लावून बघत असतो.आणि जसा पाऊस पडतो तसा शेतकरी आनंदित होऊन पेरणीला सुरुवात करतो,पावसाळा  हा शेतकऱ्यासाठी जणू एक प्रकारचा उत्सवच असल्यासारखे मला वाटते.पेरणी झाल्यानंतर पहिल्या पावसामुळे शेतामध्ये छोटी-छोटी पीक  वाऱ्याबरोबर डोलू लागते.या डोलणाऱ्या पिकाकडे बघून. शेतकऱ्याला आणि मला सुद्धा अतिशय खूप आनंद होतो.

जसा पावसाळा येतो तसा मी घराच्या छतावरती जाऊन आंघोळ करतो. पाण्यामध्ये भिजयला मला खूप आवडते. पहिल्या पावसात आंघोळ करायला खूपच मजा येते.पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचते आणि छोटे-छोटे डबके तयार होते.आणि आम्ही यामध्ये मी आणि माझे मित्र कागदाच्या छोट्या छोट्या होड्या बनवून सोडत असतो. आम्ही दरवर्षी पावसाळ्यामध्ये हा खेळ खेळत असतो.

पावसाळ्यामध्ये अनेक खेळ खेळण्याची खूपच मजा असते यामध्ये सळख खुपसणे. टिप्पस खेळणे, मातीचे छोटे छोटे बॉम्ब तयार करणे, पाण्यामध्ये दगड मारणे.इत्यादी खेळ खेळण्यात दिवस कसा निघून जातो हे मला कळतच नाही.

पावसाळ्यात मासे पकडण्याची एक वेगळीच मजा असते मी आणि माझे मित्र मासे पकडण्याकरिता दरवर्षी पावसाळ्यात जात असतो.परंतु मासे पकडून घरी आणल्यावर ती आईचा सुद्धा राग खावा लागतो.

पावसाळ्यात मला बाजारात जायला खूप आवडते कारण बाजारामध्ये सर्वत्र रंगीबिरंगी छत्र्या रेनकोट आणि अनेक प्रकारचे कपडे दिसतात. पावसाळ्याचा रेनकोट घालून शाळेमध्ये जाण्याची आणखीच एक वेगळीच मजाअसते.पावसाळ्यामध्ये मोर आपला पिसारा फुलवून नाचतो ते सौंदर्य बघण्यासाठी अनेक जण शहरातील उद्यानामध्ये सुद्धा जातात. मी पण मोराचे हे रूप बघण्याकरिता आमच्या शहरातील उद्यानामध्ये जात असतो.

पावसाळ्यात पावसाची विविध रूपे असतात, यामध्ये सर्वात जास्त मला श्रावण महिन्यातील पाऊस आवडतो.श्रावण महिन्यातला पाऊस अगदी वेगळाच असतो.अचानक दोन-चार पावसाच्या सरी अलगद येतात येतात आणि लवकरच अदृश्य पण होतात. आणि क्षणातच ऊन पडू लागते. आणि त्यानंतर परत कधी ऊन आणि कधी पाऊस अशी परिस्थिती सुरू असते.अशा या परिस्थितीत पावसात इंद्रधनुष्य निघतो या इंद्रधनुष्याचे दर्शन फक्त पावसाळ्यातच सोबत होते म्हणून मला पावसाळा हा ऋतू अतिशय प्रिय आहे.

कधीकधी पावसाळ्यात पाऊस जास्त झाला की शाळेला  सुट्टी मिळते यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आनंद होतो. घरी असताना पावसाळ्यात भजी,चहा आणि विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची मजाच असते. एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. असा हा माझा आवडता ऋतू पावसाळा त्याबद्दल जेवढे सांगितले तेवढे कमीच आहे. धन्यवाद.

पावसाळा माझा आवडता ऋतू मराठी निबंध 10 सोप्या ओळी. 10 line essay on pavasala

pavsala nibandh in marathi | maza avadata rutu pavsala nibandh in marathi

 1. उन्हाळा हिवाळा या ऋतू पैकी पावसाळा हा माझा ऋतू  आवडता आहे
 2. उन्हाळ्यानंतर जून महिन्यात पावसाळा या ऋतुला सुरूवात होते.
 3. पावसाळा हा ऋतू अतिशय महत्त्वाचा ऋतू आहे कारण उन्हाळ्यामध्ये निर्माण झालेली पाण्याची समस्या पावसाळ्यामुळे दूर होते.
 4. पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरते, त्यामुळे निसर्गात अतिशय सुंदर दिसतो
 5. पावसाळ्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे खेळ खेळत असतो यामध्ये आम्ही कागदी नाव पाण्यामध्ये सोडत असतो.
 6. पावसाळ्यामुळे जमिनीचा अतिशय आहे चांगला सुगंध येतो.
 7. पावसाळ्यामध्ये आपल्याला कधीकधी रंगीबिरंगी इंद्रधनुष्य बघायला मिळते.
 8. पावसाळ्यामध्ये मोर आपला पिसारा फुलवून नाचतो.
 9. कधी कधी जास्त पाऊस पडला की पावसाळ्यामध्ये शाळेला सुट्टी मिळते.
 10. बाजारामध्ये पावसाळ्यात छत्री आणि रेनकोट चे दुकाने लागतात.a
 11. पावसाळ्यामध्ये मला भिजायला खूप आवडते म्हणून मला पावसाळा हा ऋतू आवडतो.

तर हा होता पावसाळा या ऋतु वर मराठी निबंध म्हणजेच माझा आवडता ऋतू पावसाळा यावर निबंध. तुम्हाला हा निबंध कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या विषयावरती निबंध हवा असल्यास खाली कमेंट मध्ये सांगा. आम्ही तो लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न करू. जर तुम्हाला हा pavsala nibandh in marathi, maza avadata rutu pavsala nibandh in marathi निबंध आवडला असल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर तुम्ही हा निबंध शेअर करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या