सूर्य उगवला नाही तर निबंध लेखन मराठी | surya ugavala nahi tar nibandh marathi

 

नमस्कार मित्रांनो आज आपण सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी लेखन. सांगणार आहो.या

 निबंधामध्ये सूर्याविषयी वर्णन करण्यात आले आहे.जर सूर्य उगवला नाही तर काय होईल. मानवाच्या

 जीवनावर काय परिमाण होईल हे सांगण्यात आले आहे. तर चला मग सूर्य उगवला नाही या निबंधाला सुरुवात करूया. 
jar surya ugavala nahi tar nibandh in marathi
 jar surya ugavala nahi tar nibandh in marathi

सूर्य उगवला नाही तर ::सकाळी सकाळी आई झोपेतच ओरडली अरे सूर्य केव्हाचा उगवला. आणि तू आपला अजून निवांत झोपतोच आहे. आईचे  अर्धवट काही शब्द कानावर पडले आणि मी अर्धा जागा झालो. पण डोळ्यात असलेली झोप ही मात्र सोडायला तयार नव्हती. तेव्हा वैतागुन माझ्या डोक्यात असा विचार आला की का उगवतो हा सुर्य. सुर्य उगवला नाही तर किती बरे होईल.

 मानवाला किंवा पशुपक्षाला विश्रांतीच विश्रांती मिळेल. हवे तितके मनसोक्त झोपता येईल. उठल्यावर कसली घाई नसेल. कामे असतील ती थोडी थोडकी असतील आणि लहान मुलांना सकाळी सकाळी मारत उठावावे लागणार नाही. त्यांची जबरदस्तीने तयारी करून त्यांना सकाळी शाळेत सोडून द्यावे लागणार नाही. आणि मुख्य म्हणजे निरभ्र आकाशात चमचमणाऱ्या व पुटपुटणाऱ्या चांदण्याची रात्र व त्यासोबतच झुळझुळ हवेचा थंड गारवा बाराही महिने अनुभवायला मिळणार
वा !किती मज्जाच मज्जा!!

सूर्य उगवला नाही तर उन्हाळ्या सारख्या भयंकर ऋतूतही माणूस निवांत राहील.  कूलर एसी सारख्या चैनीच्या वस्तूर खर्च करावा लागणार नाही. सूर्य  उगवलाच नाही तर उन्हाळ्यात पडणारी पाण्याची टंचाई दूर होईल, विहिरी नद्या कधी कोरड्या पडणार नाही, पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहतील, माणसाची सर्व मेहनत बंद होईल.

पण या सर्व कल्पनाच बर्‍या आहे कारण  सूर्य शिवाय आपण सजीव प्राणी जगूच शकणार  नाही. कारण सूर्य हा आपल्या सजीवांचा जीवन जगण्याचा प्रमुख स्त्रोत आहे.
सूर्य नसला तर बाष्पीभवन कसे होणार,पाणी कसे तयार होणार आणि मुख्य म्हणजे आपण खाणार काय? झाडाचा जीवनधारा हा सूर्यच असतो.

सूर्य नसला तर प्रकाश संश्लेषण सारख्या क्रिया घडणार नाही आणि प्रकाश संश्‍लेषण क्रिया घडली नाहीतर आपल्याला अन्न कसे उपलब्ध  होईल. एकेकाळी  सूर्य नसला तर एसी कुलर सारख्या चैनीच्या वस्तू वर आपण खर्च कमी करू. पण उन्हाळ्यामध्ये मिळणाऱ्या थंड बर्फाचा गोळा, विविध आइस्क्रीम व कुरडया पापड सारख्या जिन्नस पदार्थापासून आपण वंचित राहू. लहान मुलांची शाळा तर बंद होईल पण त्यासोबतच ज्ञानाचा प्रसार ही बंद होणार. त्यामुळे कुणाचेही प्रगती होणार नाही.

शाळेमध्ये होणाऱ्या अविस्मरणीय आठवणी  तयार होणार नाही. निव्वळ करावी लागणार ती फक्त विश्रांतीच विश्रांती.
सूर्य उगवलाच नाही तर विविध सेवा पुरवणारी कार्यालय नसतील, कारखाने उद्योगधंदे नसतील  म्हणजेच नोकऱ्या नसतील मग पैसे कुठून येतील? खाणार काय.?

सूर्य नसल्यामुळे सगळीकडे काळोख असेल. फक्त काळा रंगच राहील. मग वसंत ऋतूतील विविधरंगी फुलांच्या सौंदर्याचे वैभव व श्रावणातील लावण्यवती सृष्टी याचा आस्वाद कसा घेणार, आयुष्यातून सगळे रंग हद्दपार होतील. सूर्योदय व सूर्यास्त या क्षणाचे दर्शन घेण्याचे सुख कायमचे निघून जाईल.

सूर्य उगवला नाही पाहिजे ही कल्पना खूपच वायफळ आहे सूर्य उगवला नाही तर सकाळ,दुपार,संध्याकाळ होणार नाही. कोंबडा आवरणार नाही, सूर्याची कोवळी किरणे मिळणार नाही. त्यापासून विटामिन्स डी सुद्धा मिळणार नाही, पावसाळ्यातील श्रावण महिना मिळणार नाही .
आणि आकाशात तयार होणारा सप्तरंगी इंद्रधनुष्य सुद्धा बघायला मिळणार नाही. या सर्व विचाराने जणू माझी झोपच उडाली आणि मी शुद्धीवर आलो व व बाहेर येऊन सूर्याला अर्क चढवून म्हणालो,

नको रे, बाबा तू कुठे जाऊ नको,
कारण तूच सजीवांचा जीवनदाता आहे, तू हवाच आहे.”

ओम सूर्याय नमः!!!

तर तुम्हाला सूर्य उगवला नाही तर निबंध| jar surya ugavala nahi tar nibandh in Marathi हा मराठी

निबंध आवडला असेल तर खाली कमेन्ट मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हा मराठी निबंध

आपल्या मैत्रमैत्रिणी बरोबर शेअर करा धन्यवाद. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या