3+ माझी शाळा निबंध मराठी I Majhi Shala Nibandh I My School Essay In Marathi

माझी शाळा निबंध मराठी | Majhi Shala marathi Nibandh pdf | My School Essay In Marathi 

majhi shala nibandh:नमस्कार मित्रांनो आज या लेखामद्धे आज आपण  माझी शाळा निबंध मराठी मध्ये म्हणजेच माझी शाळा निबंध  mazi shala marathi nibandh  बघणार आहोत, या निबंधामध्ये शाळे विषयी तीन वेगवेगळे निबंध दिले आहे व शाळेविषयी उत्तम असे वर्णन करण्यात आले आहे. 

माझी शाळा निबंध विकिपीडिया हा निबंध इयत्ता पाचवी,इयत्ता आठवी ते दहावी चे विद्यार्थी आपल्या शाळेविषयी निबंध यासाठी उपयोग करू शकता. तर चला मग सुरू करूया  my school essay in marathi 

माझी शाळा निबंध मराठी  I Majhi Shala Nibandh I My School Essay In Marathi
माझी शाळा निबंध मराठी  I Majhi Shala Nibandh I My School Essay In Marathi

माझी शाळा निबंध 10 ओळी | 10 lines on My School Essay In Marathi | 10 lines on Mazi Shala in Marathi


  1. माझ्या शाळेचे नाव आहे सरस्वती विद्या मंदिर.
  2. माझी शाळा ही एक जिल्हा परिषद शाळा आहे.माझ्या शाळेची इमारत खुप प्रशस्त व सुंदर आहे.
  3. माझ्या माझ्या शाळेमध्ये 20 वर्गखोल्या आहे प्रत्येक वर्गखोल्या मध्ये उत्तम लाईट व पंखे आहे.
  4. माझ्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
  5. माझ्या शाळेमध्ये सुसज्य ग्रंथालय संगणक व प्रयोगशाळा कक्ष आहे. त्यामध्ये आम्ही सर्वजण एक संगणक व प्रयोग शिकत असतो.
  6. माझ्या शाळेमध्ये खेळण्याकरिता खूप मोठे असे मैदान आहे.
  7. माझ्या शाळेतील शिक्षक खूप प्रेमळ स्वभावाचे आहे ते सर्वांना छान शिकवतात.
  8. माझ्या शाळेमध्ये सर्व सण-उत्सव महापुरुषांच्या पुण्यतिथी जयंती साजरा केले जातात.
  9. माझ्या शाळेत दर शनिवारी शारीरिक शिक्षणाचा क्लास सुद्धा घेतला जातो.
  10. माझी शाळा एक स्वच्छ सुंदर आदर्श शाळा आहे. माझी शाळा मला खूप आवडते.

माझी शाळा निबंध मराठी I Majhi Shala Nibandh in marathi I My School essay In Marathi

माझी शाळा ही ज्ञानाचे मंदिर आहे.माझ्या शाळेचे नाव वसंतराव नाईक जिल्हा परिषद शाळा आहे.  माझी शाळा ही आमच्या तालुक्यातील एक आदर्श शाळा आहे. माझ्या शाळेची इमारतखुप प्रशस्त व सुंदर आहे.

माझ्या शाळेत १० वर्गखोल्या सुसज्ज संगणक कक्ष, क्रीडांगण,वाचनालय प्रयोगशाळा इत्यादी सोयी सुविधा आहेत. माझ्या शाळेत वर्ग एक ते दहा पर्यंतचे विद्यार्थी शाळा शिकत असतात.

माझ्या शाळेचा परिसर हा निसर्गरम्य आहे तसेच तो नेहमी स्वच्छ असतो. स्वच्छता राखण्यासाठी ठिकाणी शाळेभोवती कचरापेटी उभारण्यात आल्या आहे.

माझ्या शाळेचे शिक्षक व प्रेमळ आहेत ते आम्हा सर्व मुलांना मन लावून खूप छान  शिकवतात. माझे शिक्षक माझे खरे मित्र व मार्गदर्शक आहेत. ते सतत मदतीकरिता सर्वांसाठी तयार असतात.माझ्या शाळेत दररोज सकाळी प्रार्थना व परिपाठ घेतला जातो.

माझी शाळा खेळ तसेच इतर सर्व उपक्रमात नेहमी आघाडीवर असते. मी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी होतो माझ्या शाळेत सर्व थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी साजरे केले जातात.

मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो कारण माझी शाळाफक्त शिकवण्याचे काम करीत नाही तर आम्हा मुलांवर उत्तमकार्य करते मला माझी शाळा माझे दुसरे घर वाटते मला माझी शाळा खूप खूप आवडते

माझी शाळा निबंध मराठी I Majhi Shala Nibandh in marathi my school essay in marathi

my school essay in marathi प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील जडणघडण याचे पहिले ठिकाण म्हणजे शाळा आणि ते विद्यार्थ्यांवर संस्कार रुजू होतात ते ठिकाण म्हणजे शाळा विद्यार्थ्यांच्या बाहेरील जीवनाचा सुरू होणारा प्रथम प्रवास हा शाळेतूनच होतो.

:प्रत्येकाच्या जीवनातील शाळेला मोलाचे स्थान असते शाळेच्या संबंधात अविस्मरणीय आठवणी असतातअसंच माझं पण शाळेचा प्रवास सुरू आहे मला माझी शाळा फार आवडते माझी शाळा हे माझ्या घरापासून काही अंतरावर आहे मला शाळेत जायला नेमके पंधरा मिनिट लागतात.


 मी व माझे काही सवंगडी मित्र डुलत डुलत शाळेत जात असतो माझ्या शाळेची पहिली घंटा साडेअकराला होते माझ्या शाळेला फार शिस्त आहे म्हणून मी व माझे मित्र पाच दहा मिनिट शाळेत पोहोचत असतो. 


साडेअकराला पहिली घंटा झाल्यानंतर आमचा परिपाठ असतो पहिले राष्ट्रगीत प्रतिज्ञा व संविधानाची प्रस्तावना संपूर्ण 1 ते 10 चे विद्यार्थी न चुकता म्हणतात परिपाठा नंतर आमचे वेळापत्रकानुसार तास होतात. माझी शाळा ही फार शिस्तप्रिय आहे प्रत्येक तास हा वेळेवर चालू होतो प्रत्येक विद्यार्थी हा आपापल्या वर्गात बसून असते इकडे तिकडे हिंडत फिरत नाही.mazi shala marathi nibandh


 माझ्या शाळेचा ड्रेस अत्यंत साधा आहे त्याचा रंग हिरवा पोपटी शर्ट असा आहे व मुलींना पोपटी कृती व हिरवा पैजामा ओढणी आहे आणि त्यासोबतच दोन वेण्या सक्तीच्या आहे माझ्या शाळेत ३० शिक्षक आहे ते विद्यार्थ्यांवर फार जीव लावतात माझ्या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाकडे लक्ष देतात व आमचे पिढीचे सर आमच्या शाळेत विकासाकडे लक्ष देतात


 माझी शाळा माझी शाळा पूर्व मुखी व दुसरीकडे उत्तर मुखी आहे प्रत्येक मजल्यावर पाच ते सहा वर्ग आहेत प्रत्येक वर्ग हे सुसज्ज असून प्रशस्त आहे वर्गामध्ये नेहमी हवा खेळती राहते प्रत्येक वर्गामध्ये लाईट व पंख्याची सुविधा आहे माझी शाळा हे तपकिरी रंगात नटलेली आहे. 


माझ्या शाळेत सुसज्ज ग्रंथालय आहे व तिथे बरीच सारी पुस्तके वाचण्याकरता आहे माझ्या शाळेच्या भिंती या बोलक्या आहे प्रत्येक भिंतीवर वेगवेगळ्या कविता लिहिल्या आहेत प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे शाळेचे मैदान हे प्रशस्त असून मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा आहे.


 माझ्या शाळेच्या मैदानात वेगवेगळी झाडे आहे मधल्या सुट्टीत आम्ही सर्व जण आपापले डबे घेऊन झाडाच्या सावलीत खात असतो फार आनंद वाटत असतो माझी शाळा मला फार आवडते मला शाळेत जायला पण आवडते शिवाय शाळेला कधी सुट्टी असली तर करमत नाही माझा माझ्या शाळेवर फार जीव आहे मला माझ्या शाळेतील नेहमी आठवत राहील

जर तुम्हाला माझी शाळा निबंध मराठी  My School Essay In Marathi  हा निबंध आवडला असेल किंवा तुम्हाला  essay on my school in Marathi माझी शाळा निबंध  marathi nibandh या वर काही प्रश्न असेल, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या