Telegram Group

Telegram Group

निबंध माझा आवडता खेळ | maza avadta khel nibandh

निबंध माझा आवडता खेळ | maza avadta khel nibandh 

खेळ हा असा एक प्रकार आहे की जो सर्वांना आवडतो.लहानपणी पासून तर आतापर्यंत आपण विविध खेळ खेळले असेल,नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण माझा आवडता खेळ maza avadta khel nibandh  यावर निबंध बघणार आहोत.

माझा आवडता खेळ या निबंधा मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे निबंध बघणार आहोत. यामध्ये आपण

  1. माझा आवडता खेळ क्रिकेट
  2. माझा आवडता खेळ खोखो
  3. माझा आवडता खेळ कबड्डी
  4. माझा आवडता खेळ बॅडमिंटन

हे निबंध बघणार आहोत. वर्ग 1 ते 10 पर्यंत चे विद्यार्थी निबंध आपल्या अभ्यासासाठी वापरू शकता चला तर मग सुरु करूया माझा आवडता खेळ हा निबंध 

माझा आवडता खेळ| maza avadta khel nibandh in marathi 

माझा आवडता खेळ क्रिकेट  | maza avadta khel cricket nibandh marathi madhe
माझा आवडता खेळ क्रिकेट  | maza avadta khel cricket 


माझा आवडता खेळ क्रिकेट  | maza avadta khel cricket nibandh marathi madhe

इंग्रजांच्या काळापासून तर आतापर्यंत संपूर्ण जगाबरोबर भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे क्रिकेट हा होय. क्रिकेट हा खेळ या जगामध्ये जवळपास सर्व देशांमध्ये खेळला जातो. भारतामध्ये क्रिकेट हा खेळ शहरापासून ते खेड्याच्या गल्ली पर्यंत सर्वत्र खेळला जातो.

 जर मला कोणी विचारले की तुझा आवडता खेळ कोणता तर मी क्रिकेट असे पटकन म्हणेल.मी आणि माझे मित्र विविध प्रकारचे अनेक असे खेळ खेळत असतो पण माझा आणि माझ्या प्रमाणेच माझ्या मित्रांचा पण क्रिकेट हा आवडता खेळ आहे. 

आम्ही क्रिकेट हा खेळ आम्हाला जेव्हा कधी सुट्टी मिळते तेव्हा दिवसभर खेळतो. या खेळामध्ये 11:11 गाड्यांचे दोन सघं म्हणजेच टीम असतात.व  प्रत्येकी संघामध्ये चार अतिरिक्त खेळाडू असतात.आम्ही रोज सकाळी आणि सायंकाळी नियमित मोठ्या ग्राउंड वर क्रिकेट खेळायला जात असतो.

 क्रिकेट हा खेळ खेळण्याकरिता सुरवातीला आमच्याकडे क्रिकेटचे पुरेसे साहित्य उपलब्ध नव्हते. म्हणजेच आमच्याकडे चांगली बॅट , स्टॅम् नव्हते. तेव्हा आम्ही बॅट म्हणून लाकडी कळीचा आणि स्टॅम्प म्हणून पाटीचा किंवा सायकलीचा रंगाचा वापर करीत असो पण आम्ही सर्वांनी मिळून पैसे जमा करून क्रिकेटचे साहित्य घेतले.


क्रिकेट हा खेळ खेळताना मला अतिशय आनंद होतो. जेव्हा उन्हाळ्याची शाळेला सुट्टी असते तेव्हा आम्ही क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करीत असतो. क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याच्या आधी ग्राउंड साफ करणे पीच बनवणे ग्राउंड मध्ये बॉण्ड्री चे दगड लावून त्यावर चुना लावणे इत्यादी कामे आम्ही करत असतो.
मी माझ्या टीमला एक ऑलराऊंडर खेळाडू (गडी)आहे. माझ्या टीमला स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी  मी आणि माझे मित्र सर्व प्रयत्न करत असतो.
या स्पर्धेमध्ये खेळ खेळण्यासाठी विविध  गावांमधील संघ खेळायला येतात.या क्रिकेट खेळाच्या आयोजनांमध्ये अनेक असे चुरशीचे सामने आम्हाला बघायला आणि खेळायला मिळतात.या स्पर्धेमध्ये अनेकदा आमची टीम सुद्धा विजयी झालेली आहे.

मी माझ्या टीमला या स्पर्धेमध्ये जिंकण्या करिता अनेकदा महत्त्वाचे योगदान दिले आहे. म्हणून मला मॅन ऑफ द मॅच या सारखा पुरस्कार अनेकदा मिळालेला आहे.

मी माझ्या संघांमधील ऑल राऊंडर गडी असल्याने मला ऑलीवर एक्सप्रेसचे टोपण नाव माझ्या संघाकडून मिळालेले आहे. आता सगळेजण  मला याच नावाने हाक मारतात.
क्रिकेट हा खेळ खेळल्यामुळे मला कधीच थकवा येत नाही उलट अतिशय आनंद होतो.कुठेही क्रिकेटच्या गोष्टी सुरू असेल किंवा टीव्हीवर क्रिकेट सुरू असले की मला दुसरे काही सुचत नाही. टीव्हीवर क्रिकेटचे सामने जेव्हा कधी सुरू असते तेव्हा पहिल्या चेंडू पासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत म्हणजेच मॅच संपत पर्यंत मी टीव्ही बघत बसतो.
टीव्ही वर बघायला मला सर्वात जास्त वर्ल्डकप, ट्वेंटी आणि आयपीएल बघायला आवडते. जेव्हाही कधी भारताची टीम मॅच जिंकते तेव्हा मी आणि माझे मित्र नाचून गाऊन आनंद साजरा करीत असतो.

वर्ल्डकप मध्ये तर आमच्याकडे एक प्रकारचा उत्सवच असतो आमच्या घराकडे मोठा टीव्ही लावला जाते आणि त्यावर ताई-दादा आई बाबा लहान-मोठे सर्व जण मोठ्या आनंदाने उत्साहाने वर्ल्ड कप मॅच बघतात. मी संपूर्ण वर्ल्ड कप मधला प्रत्येक सामना बघत असतो.


जेव्हा एका वर्षी भारताने वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा चक्क मी रात्री बँड घेऊन वाजत गाजत फटाके फोडून आनंद साजरा करण्याकरिता रॅली  काढली होती.

भारतीय टीम मध्ये माझा सर्वात आवडता खेळाडू हा रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी आहे. आपल्या भारतीय टीम मध्ये  खेळाडू म्हणून खेळण्याचे, माझे स्वप्न आहे.आपल्या देशाच्या टीम मध्ये खेळण्याची संधी मिळावी म्हणून आमचा का संध्याकाळी मेहनतीने परिश्रम करत आहे.
असा हा माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट आहे या खेळाबद्दल कितीही सांगितले तरी कमीच आहे.

आत्ताच आपण माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध बघितलं आता आपण माझा आवडता खेळ कबड्डी यावरून मराठी निबंध बघणार आहोत तर चला मग सुरु करूया माझा आवडता खेळ कबड्डी हा निबंध.

माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध | maza avadta khel kabaddi marathi nibandh

माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध | maza avadta khel kabaddi marathi nibandh


भारतामध्ये क्रिकेट बॅडमिंटन खोखो लंगडी कबड्डी आणि असे विविध प्रकारचे लोकप्रिय खेळ खेळले जातात.परंतु माझा सर्वात आवडता खेळ हा कब्बडी आहे.
कबड्डी हा खेळ आपण जरी मनोरंजनासाठी खेळत असतो पण हा खेळ आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असा खेळ आहे. कबड्डी या खेळामुळे आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होते.आणि यासोबतच या कबड्डी या खेळामुळे आपल्यामध्ये तंदुरुस्ती  निर्माण होते आणि आपल्या शरीराबरोबर आपल्या  बुद्धीचा सुद्धा विकास होतो. कबड्डी हा खेळ शहरापासून ते खेडेगावां पर्यंत मोठ्या उत्साहाने खेळल्या जाते.
कबड्डी हा खेळ मूळ दक्षिण आशियातील असून हा खेळ संपूर्ण भारतामध्ये खेळल्या जातो.ज्याप्रमाणे हॉकी हा खेळ आपल्या देशाचा म्हणजेच भारताचा प्रमुख खेळ आहे. त्याचप्रमाणे कबड्डी हा खेळ महाराष्ट्राचा प्रमुख खेळ आहे.
आताच सांघीक मैदानी खेळ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डी हा खेळ खेळला जातो.
कबड्डी या खेळाला हुतूतू दोन झाडू अशा अनेक नावाने विविध भागांमध्ये ओळखले जाते. कबड्डी हा खेळ आपण खुल्या मैदानात कोठेही खेळू शकतो. 

हा खेळ खेळण्याकरिता जास्त जागेची गरज नसते.याशिवाय या खेळाला खेळण्याकरिता कोणत्याही साहित्याची गरज भासत नाही.
कबड्डी या खेळाचे मैदान आयताकृती असते हे मैदान 12.5 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असते. या मैदानाच्या मधोमध एक रेषा आखून मैदानाचा दोन  समान भाग करण्यात येते. या पडलेल्या दोन सामान भागात कोर्ट असे म्हणतात.दोन्ही कोर्ट मध्ये टच रेषा बोनस रेषा आणि लॉ बी रेषा या तीन रेषा असतात.
कबड्डी हा खेळ सांघिक खेळ असल्याने हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो.यामध्ये प्रत्येक संघामध्ये बारा खेळाडू असतात परंतु त्यापैकी मुख्य सात खेळाडू हे मैदानात खेळ खेळण्यासाठी उतरतात म्हणजे येतात.
उर्वरित पाच खेळाडू हे राखीव खेळाडू म्हणून मैदानाच्याबाहेर असतात.
पहिले कोणता संघ हा रेड किंवा डाव करेल हे ठरवण्यासाठी सामन्यापूर्वी टॉस केल्या जाते. जो संघ टॉस जिंकतो. त्या संघांमधील एक खेळाडू हा आपल्या समोरील विरुद्ध संघाच्या कोर्ट मध्ये कबड्डी कबड्डी कबड्डी असे म्हणत उतरतो.
आणि आपल्या विरुद्ध संघांमधील खेळाडूंना हात लावण्याचा प्रयत्न करतो.
आणि जर तो खेळाडू समोरील संघातील गड्यांना हात लावून परत आला. तर समोरील संघातील जेवढ्या खेळाडूंना हात लावून परत आला. 

 तेवढे गुण हे विजयी संघाला दिल्या जातात.आणि जर समोरच्या संघाने त्या खेळाडूला पाय धरुन किंवा कसेही पकडले आणि त्याचा कबड्डी कबड्डी असा दम जर सुटला तर तो खेळाडू बाद ठरविण्यात येते. आणि पकडणाऱ्या संघाला गुण दिले जातात. अशा प्रकारे कबड्डी हा खेळ खेळला जातो.
मी आणि माझे मित्र आम्हाला जेव्हाही कधी शाळेतून सुट्टी मिळते तेव्हा आम्ही कबड्डी हा खेळ खेळतो.मी या खेळामध्ये पारंगत असल्याने मला आमच्या शाळेच्या कबड्डी संघाचा कर्णधार करण्यात आले आहे.
आमच्या शाळेतर्फे मी कबड्डी खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन आलो आहे आणि आमच्या संघाने जिल्हा पातळीवर अनेक अशा या स्पर्धेत विजय मिळवून पारितोषिक पण जिंकलेले आहे.
आता तर हा खेळ आपल्या देशाबरोबर विदेशातही खेळला जातो. आणि हा खेळ आता जमिनी बरोबरच मॅटवर सुद्धा खेळला जाऊ शकतो.
कबड्डी हा खेळ मला खेळण्या बरोबर  मला हा खेळटीव्हीवर बघायला सुद्धा खूप आवडते. टीव्हीवर खेळ बघत असतांना अनेक असे चुरशीचे सामने आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला पण मिळतात.
कबड्डी या खेळामुळे माझ्या शरीरा बरोबरच माझ्या बुद्धीचा सुद्धा विकास झालेला आहे. या खेळामुळे माझ्या संपूर्ण शरीराचा योग्य प्रकारे व्यायाम होतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा खेळ केला पाहिजे असे मला वाटते.
असा हा माझा आवडता खेळ कबड्डी आहे.धन्यवाद तर हा होता माझा आवडता खेळ कबड्डी.


माझा आवडता खेळ खो खो | maza avadta khel kho kho marathi nibandh


आपल्या देशामध्ये अनेक असे मैदानी आणि सांघिक खेळ खेळले जातात जसे की क्रिकेट व्हॉलीबॉल लगोरी बॅडमिंटन खो-खो कुस्ती इत्यादी.मी आणि माझे मित्र आम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आम्ही हे सर्व खेळ खेळत असतो.
पण मला जर कोणी विचारले आजचा की तुमचा आवडता खेळ कोणता आहे तर मी खूप वर्षे उत्तर देईल माझा आवडता खेळ खो खो आहे.
खो-खो हा खेळ आपल्या देशात सर्वात लोकप्रिय खेळापैकी एक खेळ आहे. हा खेळ भारतामध्ये सर्वीकडे खेळला जाणारा खेळ आहे. खो-खो हा खेळ मैदानी याबरोबरच सांघिक सुद्धा खेळ आहे.
खो-खो हा खेळ खेळायला खूप सोपा खेळ आहे.हा खेळ खेळण्यासाठी फक्त ग्राउंड शिवाय कसल्याही साहित्याची गरज असते म्हणून हा खेळ कमी खर्चिक खेळ आहे हा खेळ खेळण्यासाठी फक्त कौशल्याचे आणि खेळ खेळण्याचे नियम समजण्याची गरज असते.
योग्य प्रशिक्षणामुळे किंवा एकदा हा खेळ खेळल्यामुळे या खेळाचे नियम आपल्याला लवकरच समजतात. याशिवाय खो-खो हा खेळ खेळणारा खेळाडू आणि धावण्या मध्ये तरबेज असला पाहिजे.
खो-खो हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे प्रत्येकी संघामध्ये बारा खेळाडू असतात मात्र प्रत्यक्षात मैदानात खेळ खेळण्यासाठी प्रत्यक्षात नऊ खेळाडू मैदानात उतरतात.
दोन संघापैकी एका संघातील एकूण खेळाडूंपैकी आठ खेळाडू हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आलटून-पालटून तोंड करून बसतात. आणि उरलेला एक खेळाडू म्हणजे नववा खेळाडू हा दोन पैकी कोणत्याही एका खांबाजवळ उभा असतो.
खोखो या खेळाचे मैदान आया ता कृती असते हे मैदान 11 फूट लांब आणि 51 फूट रुंद असते.
प्रतिस्पर्धी म्हणजेच विरुद्ध संघातील तीन खेळाडू प्रथम खेळण्याकरिता मैदानात उतरतात पहिले तीन गडी बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू हे मैदानात येतात विरुद्ध संघाच्या गाड्यांना आपल्याला शिवू न देणे असा या खेळामध्ये प्रमुख प्रयत्न असतो.
प्रत्येक क्रीडा प्रमाणे या खेळांमध्ये सुद्धा काही नियम असतात.सर्वात प्रथम नाणेफेक केली जाते जो संघ जिंकतो तो संघ ठरवतो की पहिला संघ कोणता मैदानात धावायचा  आणि कोणता संघ बसायचा.
यानंतर बसलेल्या खेळाडूंना प्रतिस्पर्धी खेळाडू चा पाठलाग करावा लागतो.पाठलाग करणारा खेळाडू हा बसलेल्यांना मागून स्पर्श करून खो असे म्हणत खो देतो.
खो देताच लगेच दुसरा बदलेला खेळाडू पळणाऱ्या खेळाडूचा पाठलाग करू लागतो आणि को देणारा हा त्याच्या जागी जाऊन बसतो.
धावणारा खेळाडू हा मैदानाच्या कोणत्या हि दिशेने जाऊ शकतो परंतु त्याच्या मागे धावणारा खेळाडूला आपली दिशा बदलता येत नाही. प्रतिस्पर्धी धावणाऱ्या खेळाडूला बसलेल्या खेळाडूं च्या अधून मधून आणि खांबा मधून पण जाता येते.
परंतु त्याच्या मागे पाठलाग करत असलेल्या खेळाडूला मात्र खंबा मधून जाता येत नाही.तर त्याला खांबाला वळसा किंवा त्याच्या जवळील रेषेला स्पर्श करून पुन्हा वापस येता येते.
अशाप्रकारे खो-खो हा खेळ खेळला जातो हा खेळ खेळण्याचा वेळ साधारणता सात मिनिटे एवढा असतो.
आमच्या शाळेमध्ये हा खेळ नियमित खेळला जातो. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दरवर्षी आमच्या शाळेतील सांग हा खो-खो खेळण्याकरिता करण्याकरीता जात असतो.
यासाठी आम्ही वर्षभर खूप सराव करतो आमच्या सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही अनेक असे बक्षीस आणि पारितोषक या खेळांमध्ये मिळवले आहे.
माझ्या जोरात धावण्याच्या आणि चातुर्याने व तरबेज पणाने माझ्या शाळेतील संघाचा मला या खेळाचा कर्णधार करण्यात आले आहे.
खोखो या खेळामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि या खेळामुळे पायाच्या मास पेशी या अधिक मजबूत होतात.यासोबतच बुद्धीचा सुद्धा विकास होतो आणि आपल्या मध्ये निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा निर्माण होते.
खो खो हा खेळ लहान-मोठे गरीब-श्रीमंत आणि मुख्य म्हणजे कमी खर्चात खेळता येतो म्हणून खो खो हा माझा आवडता खेळ आहे.


माझा आवडता खेळ बॅडमिंटन maza avadta khel badminton nibandh in marathi


माझा आवडता खेळ बॅडमिंटन आहे. सुरुवातीला बॅडमिंटन हा खेळ मला आवडत नव्हता.मी हा खेळ फक्त दुरूनच बघायचं पण एकदा मी हा खेळ खेळून बघितला आणि  आतापर्यंत मी हा खेळ सतत खेळतच आहे. आता माझा सर्वात आवडता खेळ झालेला आहे.
मी या बॅडमिंटन खेळामध्ये पारंगत झालेलो आहोत मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी माझ्या मित्रांबरोबर हा खेळ खेळत असतो.
माझ्या शाळेत मी एक बॅडमिंटन चा खेळाडू आहे. खेळाच्या तासा मध्ये आम्हाला या खेळाविषयी संपूर्ण शिकवले जाते. आमच्या खेळ शिक्षकाने या खेळाविषयी चे संपूर्ण ज्ञान आम्हाला दिले आहे.त्यामुळे आम्ही सर्वजण या या खेळामध्ये पारंगत झाले आहो.
मी माझ्या शाळेतर्फे विविध स्तरावर होणाऱ्या स्पर्धेमध्ये दरवर्षी भाग घेत असतो आणि या स्पर्धेमध्ये मला अनेकदा सुवर्ण पदक सुद्धा मिळालेले आहे.
बॅडमिंटन हा खेळ खेळायला अतिशय सोपा आणि आनंददायी आहे हा खेळ आपण कुठेही खेळू शकतो.बॅडमिंटन हा खेळ खेळायला खूप कमी जागा लागते या खेळांमध्ये साधारणता दोन खेळाडू असतात पण कधीकधी हा खेळ संघामध्ये सुद्धा खेळला जातो.
हा क्या खेळण्याकरिता 2 बॅ ट म्हणजे रॅकेट लागतात आणि एक पूल साधारण भाषेत म्हणजेच एक शटल कॉक लागते.
बॅडमिंटन हा खेळ लहान-मोठे सर्व जण अतिशय आनंदाने खेडचा त्या खेळांमध्ये आपल्या शरीराचा सर्व प्रकारे व्यायाम होतो त्या सोबतच आपल्या मनाची एकाग्रता आणि आपल्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा निर्माण होते.
आपल्या देशातील अनेक तरुण बॅडमिंटन प्लेयर ने ऑलम्पिक मध्ये अनेक असे पारितोषिके मिळवले.तेव्हा मला त्यांचा अतिशय अभिमान वाटतो.
मलासुद्धा आपल्या देशासाठी ऑलम्पिक मध्ये खेळायचे आहे म्हणून मी दिवस-रात्र मेहनत करीत आहोत असा हा माझा आवडता खेळ बॅडमिंटन आहे धन्यवाद.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या