माझा आवडता प्राणी निबंध मराठी | maza avadta prani nibandh

 माझा आवडता प्राणी निबंध मराठी | maza avadta prani nibandh

नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी मराठी या ब्लॉगवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता प्राणी यावर निबंध बघणार आहोत या निबंधांमध्ये आपण.

  1. माझा आवडता प्राणी कुत्रा 
  2. माझा आवडता प्राणी वाघ
  3.  माझा आवडता प्राणी ससा
  4.  माझा आवडता प्राणी गाय
  5.  माझा आवडता प्राणी वाघ 
यावर निबंध बघणार आहोत तर चला मग सुरु करूया माझा आवडता प्राणी हा निबंध.
माझा आवडता प्राणी निबंध मराठी  maza avadta prani nibandh
माझा आवडता प्राणी निबंध मराठी  maza avadta prani nibandhमाझा आवडता प्राणी कुत्रा |  maza avadta prani kutra marathi nibandh 


माझा आवडता प्राणी निबंध: जगामध्ये विविध लोक मांजर कुत्रा ससा गाय आणि विविध पाळीव प्राणी काळजात परंतु या सर्वांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात कुत्रा हा पाळीव प्राणी पाळला जातो. अनेकांना कुत्रा हा प्राणी आवडतो त्याचप्रमाणे माझासुद्धा आवडता प्राणी हा कुत्रा आहे. माझ्याकडे एक कुत्रा आहे त्याचे नाव शिरो आहे.तो एक साधारण जातीचा कुत्रा आहे. शिरो हा आमच्याकडे जेव्हा तो सहा महिन्याचा होता तेव्हापासून आमच्याकडे तो राहत आहे.

शिरोचा जन्म एका मोठ्या असलेल्या जुन्या मातीच्या वाड्यामध्ये झाला होता. काही कारणास्तव तो वाडा जीर्ण झाल्याने  पडला आणि त्यामध्ये त्याचे सर्व भावंडं आप्तपरिवार मरण पावले. फक्त एकटाच शिरो हा जिवंत होता.त्या पडलेल्या वाड्यामध्ये मातीच्या मलब्यामध्ये मला तो दिसला. त्याची मला खूप दया आली म्हणून मी त्याला घरी आणले अशाप्रकारे शिरो हा माझ्या घरी आला.

सर्वप्रथम शिरोला घरी घ्यायला कोणी तयार नव्हते पण मी माझ्या घरच्यांना त्याला घरी आणण्यासाठी खूप आग्रह केला. तेव्हा मला शिरो ला घरी आणण्यासाठी का परवानगी मिळाली. शिरोच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि इमानदारी मुळे तो आता माझ्या घरच्यांचा सर्वात आवडता झालेला आहे.

जेव्हा आमचा शिरो खूपच लहान होता तेव्हाच फक्त दूध पीत असे. म्हणून मी त्याला एका बाटलीमध्ये दूध टाकून त्याला देत असे. शिरो हा सुरुवातीला खूपच लहान होता त्याला बाहेर झोपण्याला भीती वाटत असल्यामुळे मी त्याला माझ्या बेडवर झोपवायचो.

पण जसा शिरो मोठा झाला तसा मग आम्ही त्यांच्यासाठी एक मस्तपैकी आमच्या गार्डनमध्ये मधील कंपाऊंडमध्ये त्याला एक छोटेसे लाकडी घर बांधून दिले.शिरो हा आमच्याकडे लहानपणापासून असल्याने तो आमच्या सर्वांच्या आज्ञा एका शब्दात ऐकतो. 

घराच्या फाटकाला लटकवलेला पेपर आणणे. दूर फेकलेला बॉल आणणे, हंडशेख करने. एखादी घरातील पडून असलेली वस्तू आणणे. इत्यादी कामे शिरो एकदम आरामात करतो.

माझा आवडता प्राणी कुत्रा शिरो हा सर्वहारी आहे. शिरो चे आवडते अन्न मास आहे.
त्यामध्ये त्याला हड्या फोडून खायला खूप आवडते. मी हप्त्यातून दोन वेळा न चुकता त्याच्यासाठी मास बाजारातून घेऊन येत असतो.

आता आमचा शिरो आठ वर्षाचा झाला आहे.तो एकदम एका वाघासारखा दिसतो त्याचे मोठमोठाले दोन डोळे आणि त्याचे भरीवदार शरीर आणि त्याच्या मासूम चेहरा यामुळे तो सर्वांचा आवडता आहे.
आम्ही त्याला घरामध्ये कधी बांधून ठेवत नाही यामुळे तो स्वतंत्र पणे घरात सगळीकडे फिरत असतो त्याला घरातील सर्व वस्तू कोठे आहे याची जाणीव आहे.

 तो सर्वांचा अंगाखांद्यावर खेळतो. आमचा कुत्रा शिरो हा खूप  प्रामाणिक आणि इमानदार आहे जरी घरामध्ये तो स्वतंत्रपणे मोकळा फिरत असला तरी तो कोणत्याही अन्नाच्या वस्तूमध्ये वा भांड्यामध्ये तोंड टाकत नाही.

जेव्हा त्याला भूक लागली की तो आम्हाला ओरडून सांगतो. आणि आम्ही जोपर्यंत त्याच्या ताटात अन्न टाकत नाही तोपर्यंत तो खात नाही.

शिरोच्या असल्याने आम्हाला खूप फायदे झाले आहे.आमच्या घराकडे कोणी अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती दिसता शिरो लगेच त्याला बघून आम्हाला सतर्कतेचा इशारा देतो. यामुळे आम्ही लगेच सावध होतो.

शिरो हा रात्रभर आमच्या घराची रखवाली करतो त्यामुळे आम्ही सर्वजण निवांत  होऊन रात्रभर झोपतो. आम्हाला कुठल्याही चोरीची भीती नसते.शिरो मुळे परिसरामध्ये कोणताही चोर यायला घाबरतो.

शिरो चा स्वभाव हा खूप शांत आणि खेळ कर आहे.तो मुद्दाम कोणालाही त्रास देत नाही,तो विनाकारण कोणावरही भुंकत नाही. शिरो ला लहान मुलांबरोबर खेळायला खूप आवडते.जसे आमचे शिरो वर खूप प्रेम आहे तो आमचा सर्वांचा आवडता आहे त्याचप्रमाणे शिरो ला सुद्धा घरातील सर्व जण आवडतात.

एका वर्षी मला शाळेतर्फे विज्ञान प्रदर्शनी मध्ये तीन दिवस दुसऱ्या गावाला जावे लागणार होते. मी बाहेर गावी जाणार आहे हे त्याला कळत असतो अतिशय दुःखी झाला. आणि त्याच्या घरांमध्ये जाऊन रुसून बसला.मी त्याला समजावून सांगितल्या मुळे तो समजला आणि मला त्याने हसत खेळत जाऊ दिले. 

असा हा आमचा कुत्रा खूपच भाऊक आहे.आमचा शिरो हा ईमानदार  भावनिक तर आहेत पण याच सोबत तो कर्तव्यदक्ष सुद्धा आहे.

एके दिवशी आमचा शिरो बाहेर फिरत असताना त्याला रस्त्यावर सांड पाण्याचे झाकण उघडे दिसले.त्यामध्ये कोणी पडू नये किंवा कोणताही अपघात होऊ नये म्हणून तो त्या जागी उभा होता.

आम्ही घरी त्यांची वाट बघत होतो बराच वेळ तो घरी न आल्यामुळे आम्ही त्याला शोधण्याकरिता गेलो असता तो त्या सांडपाण्याच्या चेंबर चे झाखण लावण्याचा प्रयत्न करीत होता. ते त्याचे कृत्य बघून आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटला. असा आमचा आवडता प्राणी कुत्रा आहे.

माझा आवडता प्राणी बैल निबंध मराठी |  maza avadta prani bail 


प्रत्येकाला कोणता ना कोणता पाळीव प्राणी आवडत असतो.म्हणून मनुष्य हा कुत्रा, ससा,मांजर, गाय यासारखे अनेक पाळीव प्राणी पाळत असतो. मला जर कोणी विचारले असता तुझा आवडता प्राणी कोणता आहे. तर मी पटकन बैला असे उत्तर देईल. 

माझा आवडता प्राणी बैल आहे.आमच्याकडे चार बैले आहे परंतु या सर्व पैकी माझा आवडता सोन्या हा बैल आहे. सोन्या आमच्या बैलाचे नाव आहे.हे नाव देण्याचे कारण तो जन्माला आला तेव्हा लालसर सोनेरी रंगाचा होता म्हणून त्याला हे नाव देण्यात आले.

सोन्या बैल दिसायला खूपच सुंदर आहे.सोन्या हा जन्मताच एकदम स्वस्त आणि धडधाकट होता. त्याचे दोन मोठाले डोळे उंच असे शरीर. भरीवदार शिंगे व त्याचा रंग बघून तो अतिशय मनमोहक वाटतो.
आमचा सोन्या लहानपणापासून खूपच शांत आहे प्रेमळ आहे व या सोबत असतो कष्टाळू पण आहे.तो माझ्या आजोबा च्या शेतामध्ये विविध कामे करतो सोन्या लहान होता तेव्हापासून माझी आणि त्याची एकदम गट्टी जमली होती.

मी आणि सोन्यात लहानपणापासूनच विविध खेळ खेळायचो तो माझी सर्व भाषा समजतो. मी सोन्या अशी हाक दिली की तो कोठेही असो लगेच हंबरून मला प्रतिउत्तर देतो. आणि लगेच आवाजाच्या दिशेने पळत येतो.

आमचा बैल सोन्या आता मोठा झालेला आहे तो आता शेतातील सर्वच कामे करतो,जसे की नांगरणे वखरणे बैलगाडी शेतामधील माल कापूस इत्यादी कामे तो करतो.

आमचा सोन्या शरीराने खूप धडधाकट आहे तो कामासाठी सदैव तयार असतो तो कधी ही आळस करत नाही म्हणून तो सर्वांचा आवडता आहे.सोन्या शेतातील अवजड कामे कुशलतेने करतो.
आम्ही यात्रेच्या दिवशी सोन्याच्या बैलगाडी मध्ये बसून दुसऱ्या गावातील यात्रेला जातो. 

सोन्या आमचा बैल अतिशय इमानदार आणि आज्ञाधारक आहेत तो शेतावर जाण्यास वेळेवर हजर असतो, तो उनाड कुठेही फिरत नाही सोन्याला राहण्यासाठी आम्ही आमच्या आवारामध्ये एक गोठा केला आहे त्यामध्ये तो रात्रीच्या वेळेला राहतो.

सोन्या सकाळी लवकर उठतो आणि सर्वांना हंबरून तो सगळ्यांना सकाळी लवकर जागी करतो.
माझे आजोबा सोन्याची अत्यंत प्रेमाने वागतात त्याला कधीही मारत नाही मी आणि माझे आजोबा दररोज त्याला शेतात असलेल्या नदीवर आंघोळ करण्यासाठी नेतो.

बैलपोळ्याच्या दिवशी तर सोन्याचा खूपच थाट असतो या दिवशी त्याला सर्व प्रकारचे नवीन वस्तू दिल्या जातात खास त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खायला दिले जाते आणि विशेष म्हणजे त्याला पुरणपोळी दिली जाते या दिवशी आम्ही आमच्या सर्व बैला सोबत याचीसुद्धा पूजा करतो त्या दिवसाला त्याला कोणते प्रकारचे कष्टाचे काम सांगितले जात नाही त्याला दिवसभर आराम असतो. असा आमचा सोन्या बैल सर्वांचा आवडता आहे.


माझा आवडता पाळीव प्राणी गाय मराठी निबंध | maza avadta prani gay nibandh in marathi 

गाय प्राणी सर्वांनाच प्रिय असतो आणि ती एक पाळीव प्राणी आहे गायी स्वभावाने खूप शांत असते आपल्या पिल्लासाठी म्हणजे वासरासाठी गाई ही खूप मायाळू असते

म्हणून बहुतेक जण तिला गौमाता असे म्हणतात.हिंदू संस्कृती मध्ये गाय ही पूजनीय आहे तिची पूजा केली जाते पोळा या सणाला बैलाला बरोबरच गाय ची सुद्धा पूजा केली जाते.

गायी शेती व्यवसायाला पूरक आहे गाईचे दूध फार पौष्टिक असते त्यापासून विविध प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ बनवता येते जसे की दही, तूप, लोणी, ताक इत्यादी.

गायीच्या दुधापासून पंचामृत सुद्धा बनवले जाते हे मानवी आरोग्यासाठी फार उपयोगी आहे तसेच गाईचे गोमुत्र आणि शेन याचा सुद्धा मानवाला बराच फायदा आहे.गोमूत्र सेवन केल्याने मानवी शरीरातील रोग नष्ट होतात.व गाईच्या शेणाचा वापर पूर्वीच्याकाळी घर सारवण यासाठी केला जात असे.कोठेकोठे आत्ता पण केला जातो.

तसेच गाईच्या शेणाला थापून टाकून त्यापासून  गौर्‍या बनवल्या जाते त्याचा खेडोपाडी इंधन म्हणून वापर केला जातो.गायीच्या पोष्टिक दुधासाठी त्यांनाही पोष्टिक अन्न असले पाहिजे. तिच्या सेवना मध्ये सुद्धा शुद्ध चारा व कडबा धान्य असायला.हवे गाईचे मुख्य दोन प्रकार असतात देशी व परदेशी यामध्ये भारतीय गाईमध्ये 40 प्रजाती आहे.

गाय ही दिसायला बैला पेक्षा छोटी असते.तिला दोन सिंग एक तोंड दोन कान चार पाय आणि एक लांबच शेपटी असते.गायचा रंगा प्रमुख्याने पांढरा लाल काळा असतो गायी इतर प्राण्यांप्रमाणेच पहाटे चार वाजता उठते 

गाई सकाळी तिचे अन्न जसे की हिरवा काला कडबा कुठार व दुपारच्या प्रहरी जेव्हा ती एखाद्या झाडाखाली विश्रांती करत असते तेव्हा ते रवंथ करत असते.सर्व प्राण्यांमध्ये उत्तम प्रेमळ शांत अशी काही माणसाच्या व्यवसायात तसेच दैनंदिन जीवनात फार मोलाचे कार्य करते .

प्रत्येक माणसाच्या दिवसाची सुरुवात ही तिच्यापासून मिळणाऱ्या दुधापासून अचूक होते गाईपासून मिळणाऱ्या प्रत्येक घटकापासून माणसाला खूप फायदा होतो मग ते तिचे दूर असो वा शेण असी वा मूत्र.म्हणून गायीमध्ये 33 कोटी देव वसले आहे असे मानले जाते यामुळेच भारतामध्ये गाय ही फार पूजनीय आहे.अशी प्रेमळ मायाळू व माणसाला पदोपदी उपयोगी पडणारी गाय कुणाला नाही आवडणार म्हणूनच गाय हा माझा आवडता प्राणी आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या