माझा आवडता सण निबंध मराठी | maza avadta san nibandh

 माझा आवडता सण निबंध मराठी | maza avadta san nibandh


भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे या देशांमध्ये सर्व जाती पंथाचे लोक राहतात या देशांमध्ये विविध सण साजरे केले जातात. भारतामध्ये प्रमुख सण हे  दसरा-दिवाळी आहे.
आजच्या इन्फिनिटी मराठी या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण माझा आवडता सण यावर निबंध बघणार आहोत या निबंधामध्ये विविध सणाचे वर्णन करण्यात आले आहे.
माझा आवडता सण या निबंधांमध्ये आज आपलाच राधिका दसरा-दिवाळी रमजान बैलपोळा इत्यादी निबंधावर तरी सणावर निबंध बघणार आहोत तर चला मग सुरु करूया निबंध माझा आवडता सण


माझा आवडता सण मराठी निबंध | maza avadta san essay in marathi 


माझा आवडता सण होळी मराठी निबंध  maza avadta san holi nibandh in marathi

भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशामध्ये अनेक जाती,धर्माचे पंथाचे लोक मिळून मिसळून मोठ्या आनंदाने राहतात.

भारत या देशाला म्हणजेच आपल्या देशाला उत्सवाचा देश किंवा सणांचा देश म्हणून सुद्धा ओळखले जाते.आपल्या देशामध्ये दिवाळी-दसरा गणेश उत्सव गुढीपाडवा होळी ईद याव्यतिरिक्त अनेक असे सण सर्वजण मोठ्या आनंदाने मिळून मिसळून साजरे करतात.

आपल्या देशांमध्ये उत्सव,सण साजरी करण्याची प्रथा फार पूर्वीपासून म्हणजेच आपल्या पूर्वजांना पासून सुरू आहे. व ती प्रथा आजही सुरू आहे.

मी पण आपल्या देशामध्ये येणारा प्रत्येक सण साजरा करीत असतो परंतु या सर्व सण पैकी माझा सर्वात आवडता सण होळी आहे.

होळी या सणाची काही एक  वेगळीच मज्जा आहे हा सण जसजसा जवळ येतो तसा तसा वातावरणामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते.

होळी हा सण भारतामध्ये खूप प्राचीन काळापासून साजरा केला जातो होळी या सणा ला प्रेमाचा आणि रंगाचा सण म्हणून सुद्धा ओळखले जाते.होळी हा सण भारतामध्ये सर्वीकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पण या सणाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखतात.

सगळ्या प्रमाणे आमच्या कॉलनी मध्ये पण होळी हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. होळी या सणाची तयारी आम्ही होळी येण्याच्या एक हप्ता पहिले सुरू करतो.दरवर्षी नेहमीप्रमाणे होळीची काय रूपरेषा आहे? काय काय साहित्य आणावे लागेल? कोण कोणते कामे करेल? यासाठी  कॉलनी मध्ये एक सार्वजनिक मिटिंग होते. 

नंतर सर्व आपापल्या परीने वर्गणी गोळा करतात आणि प्रत्येकाला वाटून दिलेल्या कामांना लागतात. मी आणि माझे सगळे मित्र छान पैकी ग्राउंड स्वच्छ करने झाडून टाकणे. ग्राऊंडला गोल रिंगण आखणे नंतर वर्गणीतून आलेल्या पैशातून होळी साठी लागणारे साहित्य व लाकडे विकत आणणे यासारखी कामे करतो.

होळीच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते होळीच्या दिवशी सकाळीच होळी पेटवण्याचा जागी आम्ही चुन्याने एक मोठा गोल आखून त्यावर दगडे ठेवतो.
त्यानंतर मधो मध एक खड्डा करून त्यामध्ये काही पैसे टाकतात आणि त्यावर एक मोठा खांब उभा केला जातो.

आणि मग विविध प्रकारचे लाकडे शेणाच्या गौऱ्या शेतकऱ्याकडील वाळीव इंधन इत्यादी रचून होळी तयार केले जाते. मी सुद्धा होळीमध्ये टाकायला चाकोल्या दरवर्षी तयार करीत असतो.

जशी संध्याकाळ होते तेव्हा होळी च्या मुहूर्तावर होळीचे दहन म्हणजे होळी पेटवली जाते सर्वजण होळी ची गोल गोल फिरून पूजा करतात. आणि नैवद्य चढवतात. त्यानंतर सर्वजण आपल्या जीवनातील कष्ट दुःख दूर झाली पाहिजे म्हणून होळी कडे प्रार्थना करतात. 

प्रार्थना झाल्यानंतर सर्वजण एकमेकांना प्रसाद वाटून एकमेकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतात. अशा प्रकारे होली दहनाचा कार्यक्रम केल्या जातो. दुसर्या दिवशी पहाटेच होळी वर सर्व जण आपापल्या घरून हंडे भरून पाणी आणून ठेवतात. 

होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमीचा दिवस. या दिवसाला धुलीवंदन असेसुद्धा म्हटले जाते. रंगपंचमी म्हणजे धुलीवंदन हा माझा वर्षातील सर्वात आवडता दिवस असतो या दिवसाची  मी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो.

या दिवशी मला सर्वात जास्त आनंद होतो रंग पंचमी म्हणजे रंगाचा सण या दिवशी मी आणि माझे मित्र सकाळी लवकर उठून तयार होऊन पांढरेशुभ्र वस्त्र घालून रंग लावण्याकरिता बाहेर निघतो. सर्वात प्रथम आम्ही घरच्यांच्या मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन त्यांना रंग लावून बाहेर येतो.

रंगपंचमी म्हणजे धुलीवंदन साठी आम्ही रंग हे स्वतः तयार करीत असतो. या रंगांमध्ये आम्ही पळसाच्या फुलांपासून रंग बनवतो त्यामुळे  कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. आणि या व्यतिरिक्त आम्ही रंगामध्ये गुलालाचा वापर करतो.

रंगपंचमीच्या दिवशी सकाळी सर्वजण लवकर उठून पांढरे वस्त्र घालून परिसरात असलेल्या मैदानात एकत्र येतात, सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते ग्राऊंडमध्ये मस्तपैकी लाऊड स्पीकर चालू असते आणि सर्वजण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने एकमेकांना रंग लावत नाचत गाऊन रंगपंचमी साजरी करत असतात.

रंगपंचमी झाल्यानंतर घराकडच्या काकू आम्हाला गाट्या देतात. गाट्या हा माझा आवडीचा प्रकार आहे. नंतर मी घरी येऊन स्वच्छ अंघोळ करीत असतो.
या दिवशी घराघरात मी पुरणपोळीआणि  विविध विविध प्रकारचे तळणाचे पदार्थ पकवान बनवले जाते. असा हा माझा आवडता सण होळी आहे.

होळी हा माझा आवडता सण आहे कारण या सणांमध्ये सर्वजण एकमेकांचे भांडण-तंटा विसरून पुन्हा एकदा एकत्र येतात. होळी आणि रंगपंचमीमुळे अनेकांच्या मनातील मनमुटाव दूर होतो.

होळी या सणामुळे माणसामाणसातील माणुसकीची आपुलकीची भावना वाढते रंगपंचमीच्या दिवशी आपण एका रुसलेल्या व्यक्तीला सुद्धा म्हणू शकतो आणि त्यांच्या अंगावर रंग टाकतात बुरा न मानो होली है असे म्हणून होळी साजरी करत असतो.


माझा आवडता सण  गणेशोत्सव म्हणजेच | maza avadta san ganesh chaturthi in marathi ganesh utsav nibandh in marathi 


आपल्या देशामध्ये अनेक असे सण साजरे केले जातात पण त्यामध्ये सर्वात माझा आवडता सण  गणेशोत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी आहे. गणपती बाप्पांचा हा सर्वांचा आवडता सण आणि सर्वांना प्रिय असतो. 

वर्षभर मी आणि माझे मित्र गणेश उत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी ची वाट बघत असतो. गणेशोत्सव येताच वातावरणातील सर्व निराशा दूर होऊन सगळीकडे आनंदाचे खुशीचे आणि उत्साहाचे भक्तिमय वातावरण पसरते.

गणेशोत्सव हा सण भारताबरोबरच विदेशातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतामध्ये घराघरात आणि प्रत्येक गल्लीमध्ये हा सण मोठ्या भक्तिभावाने आनंदाने साजरा करतात.

गणेशोत्सव हा सण सप्टेंबर महिन्यात म्हणजेच भाद्रपद महिन्यात येतो.या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणपती गणेश चतुर्थी किंवा गणेश जयंती असेसुद्धा म्हणतात.

माझ्या घरी पण आम्ही गणेश उत्सव मोठ्या आनंदाने दरवर्षी साजरा करतो. मी आणि माझ्या घरातील सर्व मंडळी गणेशोत्सव येण्याआधीच गणेशोत्सवाच्या विविध तयारीला लागतो.

यामध्ये घरातील गणपती बसवण्याचा करिता,  घराची छान साफसफाई केली जाते घराची साफसफाई झाल्यानंतर घराला छान रंग दिला जातो नंतर गणपती साठी आम्ही एक छान मस्तपैकी घरात डेकोरेशन करून एक आसन बनवतो.व त्याला शोभा येण्यासाठी लाइटिंग लावतो.

या सर्व सजावटीमुळे सर्व घर प्रकाशमय होते. घरामध्ये प्रसन्न वाटायला लागते  आणि घरात एक प्रकारचे भक्तीमय व उसाचे वातावरण निर्माण होते.मग आम्ही सर्वजणी गणेशमूर्ती आणण्याकरिता जात असतो. मग घरी मूर्ती आणून तिची पूजा विधी करून गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करतो.
गणपती बाप्पा घरी आल्यावर ती घरातील वातावरणात आणखीच भव्यता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. सर्व प्रकारची वातावरणातील निराशा दूर होऊन जाते.

आमच्याकडे गणपती हा अकरा दिवसाचा असतो. पाणी कोणी कोणी दीड दिवसाचा,अडीच दिवसाचा, पाच दिवसाचा गणपती बसवतात.गणपती घरी आल्यापासून सर्वजण सकाळी लवकर उठून तयार होऊन गणपतीच्या सेवेच्या कार्यामध्ये गुंग होतात. आई गणपतीसाठी फुले व दुर्वा आणते. ताई छान पैकी अंगण झाडून त्यावर सुंदर ची रांगोळी काढते. बाबा बाजारात जाऊन हार विकत आणतात. आणि मी सुद्धा त्यांच्या कामांमध्ये हातभार लावत असतो अशाप्रकारे सर्व झाली आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात.

रोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते आरती नंतर मिळणारा प्रसाद म्हणजे एक गणपतीचा आवडता पदार्थ मोदक गणपती बाप्पांना चढवला जातो. त्यानंतर तो प्रसाद सर्वांना दिला जातो. 

गणपती बाप्पा प्रमाणेच मलासुद्धा मोदक खूपच आवडतात.गणपती मध्ये मोदक खाण्याची काही वेगळीच मजा असते या दिवसाची वाट मी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो.
गणेश उत्सव हा माझा आवडता सण आहे कारण या दिवसांमध्ये घरी सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. घरी पाहुणे येतात. मित्र येतात त्यामुळे खूप मजा येते.

रोज निरनिराळे पदार्थ खायला मिळतात आणि मुख्यमंत्री शाळेत पण गणपती बसवतात म्हणून खूपच आनंद वाटतो.गणपतीचे दहा दिवस कसे आनंदात निघून जातात ते कळत सुद्धा नाही. दहाव्या दिवशी आम्ही सर्वजण सर्वांना घरी जेवणासाठी बोलवतो.

त्यानंतर जो दिवस येतो तो म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस या दिवशी मला अतिशय खूप दुःख होते. कारण गणपती बाप्पा आपल्या पासून दूर जातात आणि पुन्हा एका वर्षांनी परत येतात. म्हणून अतिशय मला उदास वाटते.

पण आम्ही सर्वजण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणून छान वाजत गाजत गणपतीचे मिरवणूक काढून विसर्जन करतो आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थी ची वाट बघत बसतो. असा हा माझा आवडता सण गणेश चतुर्थी आहे धन्यवाद


बैल पोळा निबंध   | maza avadta san bail pola 


जगामध्ये सर्वात जास्त सण भारतामध्ये साजरे केले जाते म्हणूनच भारताला सणाचे माहेरघर असेसुद्धा म्हटले जाते आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक मकर संक्रांति होळी दिवाळी ईद नाताळ रक्षाबंधन नागपंचमी बैलपोळा आणि इतर सण मोठ्या आनंदाने व गुनागोविंदांनी साजरा करतात.
आजच्या लेखामध्ये आज आपण बैल पोळा या सणा वर निबंध बघणार आहोत तर चला मग सुरु करूया बैल पोळा हा निबंध.

बैलपोळा हा सण मुख्यत्वे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि सोबतच हा सण संपूर्ण भारतामध्ये पण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
बैलपोळा हा माझा सर्वात आवडता सण आहे. श्रावण महिन्यात एका मागे एक लागोपाठ अनेक असे सण येतात.

आणि श्रावण महिन्याच्या शेवटी बैलपोळा हा सण श्रावण महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच भाद्रपद अमावस्येला येतो.बैलपोळा सण शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे बैल पोळा हा सण शेतकरी आपल्या बैलांच्या प्रती कृतज्ञता सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा करीत असतात.

वर्षभर शेतामध्ये शेतकऱ्यांची शेत कामांमध्ये मदत करणाऱ्या आपल्या सर्जा-राजाचा या दिवशी आराम असतो. या दिवशी बैलाला कडून कोणतेही काम करून घेतले जात नाही.

बैलपोळा सण ज्या दिवशी असतो त्या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठून आपापल्या बैलाला छान पैकी स्वच्छ करून आंघोळ करतात. त्यानंतर बैलाला त्याच्या मन मन पसंतीचे म्हणजे आवडते खाद्य दिले जाते. 

या दिवशी प्रत्येक जण आपल्या बैलाची सेवा करीत असतो. बैलपोळ्याच्या दिवशी बैलाची खास निगा राखली जाते, या दिवशी हळद आणि तुपाचा या दिवशी बैलाचे अंगा खांद्याला शेक दिला जातो. याशेखला  खांडशेख असेसुद्धा म्हणतात.

त्यानंतर बैलाला सजवण्या करिता त्याच्या पाठीवर अतिशय सुंदर नक्षीकाम असणारी देखणी शाल त्याच्या अंगावर पांघरली जाते.आणि बैलाच्या डोक्यावर ते बाशिंगे संपूर्ण अंगाला विविध प्रकारचे ठिपके आणि गळ्यात नवी न माळ घालतात.

सर्व जण आपला बैल अधिक उठून दिसला पाहिजे म्हणून खूप मेहनत करून बैलाला सजवतात. आणिनंतर घरातील स्त्रिया त्यांची पूजा करून त्यांना पुरण पोळी तू आणि आणखी गोड-धोड पदार्थ खायला देतात.

ज्यांच्याकडे बैल नसतो ते लोक मातीच्या बैलांची पूजा करतात आणि त्यांना नैवेद्य देतात.बैलपोळ्याच्या दिवशी जो वर्षभर बैलांची काळजी घेतो म्हणजे बैलकऱ्याला नवीन कपडे घेतले जाते.व  त्याला सुद्धा गोड पदार्थ खायला देतात.

अशाप्रकारे बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी रात्रीच्या वेळेला बैलांची वाजत गाजत गाऊन मिरवणूक काढली जाते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या