मी फळा बोलतोय | mi phala boltoy marathi nibandh

    नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी मराठी या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे,आजच्या लेखामध्ये आज आपण मी फळा बोलतोय हा मराठी निबंध म्हणजेच फळ्याचे आत्मवृत्त हा निबंध बघणार आहोत या निबंधामध्ये शाळेतील फळा हा एका विद्यार्थ्यासोबत बोलताना दाखवले आहे आणि फळा जर बोलू लागला तर काय बोलेल हे सांगण्यात आले आहे, तर त्याला मग सुरू करूयात mi phala boltoy marathi nibandh मी फळा बोलतो हा निबंध.

mi phala boltoy marathi nibandh|मी फळा बोलतोय  निबंध 

mi phala boltoy marathi nibandh|मी फळा बोलतोय  निबंध
mi phala boltoy marathi nibandh|मी फळा बोलतोय  निबंध 

आमच्या शाळेचे भाषण स्पर्धा काल आयोजित करण्यात आली होती.त्या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी त्यांचे नाव मोठ्या अक्षरात फळ्यावर नाव लिहिण्याची माझ्यावर जबाबदारी दिली होती म्हणून आज लवकर शाळेत जाऊन कामाला लागलो होतो एवढ्यात मला मी फळा बोलतोय असा मला आवाज आला, इकडे तिकडे बघतो तर काय चक्क फळा माझ्या सोबत बोलत होता. व मी फळ्याचे बोलणे ऐकू लागलो.

मित्रा मी फळा बोलतोय मला तर तू ओळखतोस ना माझ्यावर दररोज तू सुंदर अक्षराने सुविचार दिनविशेष लिहितो.रोज मी म्हणतो की तुझ्यासोबत बोलावे पण योग जुळत नव्हता पण आज योगायोगाने तू लवकर शाळेत आला आणि मी पण ठरवले की आज तुझ्या सोबत बोलायचे. 


तर एक मित्रा मला तुला काही आज सांगायचे आहे तर मी फळा बोलतोय माझा जन्म  हजारो वर्षांपूर्वी झाला सुरुवातीच्या काळामध्ये मी माझा रंग हा काळा होता माझे स्वरूपे कधी चौकोनी तर कधी आयताकृती असे असते.माझ्यामध्ये विविध बदल होऊन माझा रंग काळा पांढरा आणि हिरवा झाला आणि मी विविध प्रकारे उपलब्ध असतो यामध्ये जसे की प्लास्टिक लाकडी ग्रॅनाईट आता तर सुद्धा चक्क डिजिटल बोर्ड मध्ये सुद्धा  माझे रूपांतर करण्यात आली आहे.


जगामध्ये शिक्षणासाठी प्रत्येक शाळेत माझा वापर होतो. मी प्रत्येक शाळेच्या वर्गातील एक अविभाज्य भाग आहे माझ्यामुळे तुम्हाला शिक्षण घेणे सोपे झाले आहे जर मी नसतो तर तर तुम्हाला शिकण्यासाठी खूप परिश्रम करावे लागले असते आणि अवघड विषय तुम्हाला योग्य रित्या समजले नसते.
वर्गाच्या तासात सर्वजण तुम्ही माझ्या समोर बसून शांतचित्ताने शिक्षण घेतात तेव्हा मला तुमचा खूप अभिमान वाटतो.


गणिताचे शिक्षक मोठमोठाले गणिते माझ्यावर लिहून तुम्हाला सोडवून दाखवतात यामुळे तुम्हाला पटापट गणित येतात तर विज्ञानाचे शिक्षक, इतिहासाचे शिक्षक आणि भुगोलाचे शिक्षक माझ्यावरती कठीण अशा आकृत्या काढून तुम्हाला सोपे करून शिकवता यामुळे तुम्हाला या विषयात अधिक रुची निर्माण होते. चित्रकलेच्या तासात तर अनेक विविध प्रकारचे रंगीबेरंगी चित्र माझ्यावर काढले जाते तेव्हा मला अतिशय आनंद होतो.

जेव्हा तुम्हाला शिक्षक शिकविताना लिहिण्याकरिता माझ्याकडे वळतात.तेव्हा तुम्ही जी एकमेकासोबत जी कुज बुज, थट्टा, मस्करी करतात ती मलाच माहिती असते पण मी ही गोष्ट कधीच तुमच्या शिक्षकांना सांगितली नाही.
आणि जेव्हा तुम्हाला शिक्षक मस्ती करताना तुम्हा विद्यार्थ्यांना पकडतात आणि शिक्षा देत फळ्याकडे कान धरुन उभे करतात तेव्हा मला तुमच्यावर खूपच हसू येते.

तुम्ही विद्यार्थी हे माझे एकाप्रकारे जवळचे सवंगडी आहे.तुमचे हसणे,रडणे,गप्पागोष्टी, तुमचे मन लावून शिकणे. हे वातावरण मला अतिशय रमणीय वाटते, यामुळे माझा दिवस कसा जातो हे मला कळत सुद्धा नाही.पण जशी तुम्हा विद्यार्थ्यांची शाळेची घरी जायची वेळ होते म्हणजेच सुट्टीची घंटा वाजते तेव्हा मात्र मला अतिशय दुःख होतं कारण तुम्ही सर्वजण घरी जातात व मी रात्रभर एकटाच असतो. तुम्ही शाळेत परत कधी येता, याची मी वाट बघत रात्रभर आराम करत असतो. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी शाळेत परत येतात तेव्हा मला पुन्हा अतिशय आनंद होतो.
माझा उपयोग शिक्षणासोबतच सुविचार दिनविशेष लिहिण्यासाठी, वेगवेगळ्या सूचना देण्यासाठी, आणि बऱ्याच कामासाठी होतो.


सर्व विद्यार्थी शाळेच्या आवारामध्ये रांगा लावून दिनविशेष सुविचार बोधकथा सांगतात तेव्हा मला तुमच्या गर्व होतो आणि जेव्हा तुम्ही 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आणि विविध दिवशी माझ्यावरती जी सजावट करतात तेव्हा मला अतिशय आनंद होतो.

पण कधी कधी मला दुःख सुद्धा होते तुमच्या पैकी काही खोडकर विद्यार्थी मला छडीने मारतात. शाळेतून घरी जाताना माझ्यावरती नाना प्रकारचे काही पण लिहितात.यामुळे मला अतिशय राग सुद्धा येतो परंतु तुम्ही विद्यार्थी आहे म्हणून मी हा राग शांत करून तुम्हाला माफ करीत असतो


दिवसेंदिवस काळा रंगांमध्ये असणारा मी आता थोडा थोडा विलुप्त होतो आहे माझ्या जागी आता प्लॅस्टिकचे नवीन फळे बोर्ड आणि ग्रीन बोर्ड आले आहे.कुठे तर डिजिटल फळे आल्यामुळे आता मात्र माझे म्हणजेच काळ्या फळ्याचे महत्त्व थोडे कमी झाले आहे परंतु तोही एक प्रकारचा फळा आहे.म्हणून मला अतिशय चांगले वाटते.


मित्रा या शाळेत माझ्यावरती लिहून वाचून अनेक विद्यार्थी मोठमोठाले ऑफिसर झाले. अनेकांना  सरकारी नोकऱ्या लागल्या म्हणून  माझे शिक्षणा मध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. मग मी कोणत्याही स्वरूपात उपलब्ध असो.


मी निस्वार्थ भावनेने तुमची सेवा करीत असतो.म्हणून तुम्ही सर्वांनी फळ्याचे माझे आभार मानणे आवश्यक आहे आणि माझी काळजी पण घेणे आवश्यक आहे माझ्याबद्दल कितीही सांगितले तरी कमीच आहे म्हणून मित्रा दुसऱ्यांची सदैव निस्वार्थ भावनेने माझ्या प्रमाणे मदत करीत जाआणि एवढे माझे चार शब्द ऐकून घेतल्यामुळे तुझी धन्यवाद एवढे बोलून फळ्याचे बोलणे शांत झाले.


तर विद्यार्थ्यांना असा होता मी फळा बोलतो मराठी निबंध mi phala boltoy marath  nibandh  म्हणजेच फळ्याचे आत्मवृत्त हा निबंध जर तुम्हाला मी फळा बोलतोय हा निबंध आवडला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर सोशल मीडियावर शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा मदत होईल धन्यवाद



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या