Telegram Group

Telegram Group

माझा शाळेतील पहिला दिवस निबंध मराठी | shaletil pahila divas nibandh in marathi

 माझा शाळेतील पहिला दिवस निबंध मराठी | shaletil pahila divas nibandh in marathi 

माझा शाळेतील पहिला दिवस निबंध मराठी:प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शाळेचे महत्त्वाचे स्थान असते.शाळा म्हणजे जणू विद्यार्थ्याचे एक प्रकारचा परिवार असतो. विद्यार्थ्याला सर्वात जास्त जर मजा कोठे येत असेल तर ते ठिकाण म्हणजे शाळा होय.प्रत्येक विद्यार्थी हा दररोज शाळेत जात असतो पण प्रत्येकाचा आठवणीचा दिवस असतो तो म्हणजे शाळेचा पहिला दिवस. शाळेचा पहिला दिवस हा तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. माझ्या पण शाळेचा मला पहिला दिवस आजही आठवतो

नमस्कार मित्रांनो वरील परिच्छेदा वरून आपल्याला कळले असेल की आजच आपला निबंध हा माझा शाळेचा पहिला दिवस यावर आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाची एक  वेगळीच मजा, आठवण असते आणि थोडी मनामध्ये थोडी भीतीचे वातावरण असते. चला तर मग सुरु करूया माझ्या शाळेतील पहिला दिवस हा निबंध.shaletil pahila divas nibandh in marathi 


माझा शाळेतील पहिला दिवस निबंध मराठी | shaletil pahila divas nibandh in marathi
माझा शाळेतील पहिला दिवस  | shaletil pahila divas nibandh in marathi 


maza shaletil pahila divas nibandh in marathi | maza shalecha pahila divas in marathi essay 

माझा शाळेतील पहिला दिवस निबंध मराठी | shaletil pahila divas nibandh in marathi 

श्री शिवाजी विद्यालय ही माझी शाळा मी वर्ग पाच चा  विद्यार्थी आहे शाळेचे वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही.आणि एक मेला परीक्षेचा रिझल्ट लागला आणि यासोबतच शाळेला सुट्ट्या लागल्या.उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत होत्या आणि 

शाळा सुरू होण्याची वेळ जवळ आली च होती नी होती की माझ्या बाबांची दुसरा गावाला बदली झाली. आणि मला बाबासोबत दुसऱ्या गावी जावे लागले आणि दुसऱ्या गावाला दुसऱ्या शाळेत जावे लागले.

माझ्या शाळेचे नवे सत्र सुरू होणार होते आणि संपूर्ण शाळा ही माझ्यासाठी नवीन होती. शाळेचा माझा पहिला दिवस जवळ येत होता. त्या अगोदर मी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवसाची संपूर्ण तयारी केली होती.नवीन शाळेचा नवीन गणवेश विकत घेतला,

 नवीन बूट, नवीन दप्तर, सर्वकाही नवीन वस्तू मी घेतल्या आणि शेवटी तो दिवस आला त्या दिवशी शाळा ही सुरू होणार होती.

शाळेच्या पहिल्या दिवसाच्या विचारात  मला रात्रभर झोपच आली नाही.शाळेमध्ये पहिल्या दिवशी काय होईल तेथील शिक्षक कडक तर नाही ना. तेथील विद्यार्थी माझ्याबरोबर मिळून-मिसळून राहतील की नाही इत्यादी प्रश्न माझ्या मनामध्ये गोंधळ घालत होते.

सकाळ झाली मी लवकर उठून आंघोळ केली छान पैकी नीटपणे इस्त्री केलेला शाळेचा गणवेश घालून शाळेसाठी तयार झालो.
माझ्या आईने पण लवकर उठून माझ्यासाठी डबा तयार केला आणि मग मी आई आणि बाबा जेथे शाळेची स्कुलबस येते त्या जागी जाऊन उभे झालो.

माझ्या शिवाय अनेक विद्यार्थी सुद्धा माझ्या प्रमाणे तयार होऊन शाळेच्या बस ची वाट बघत होते. सर्व वातावरण अगदी मस्त वाटत होते आणिआपण नवीन शाळेत जाणार. आपल्याला नवीन नवीन मित्र मिळणार नवे शिक्षक मिळणार याचा आनंद होत होता आणि 

या सोबतच मनामध्ये थोडी भीती आणि धड धड पण होती.पण मी ती माझी अवस्था कोणालाही दिसू दिली नाही.मग शाळेची बस आली आणि आम्ही सर्वजण बस मध्ये चढलो बस मधील चपराशी काकांनी आमचे दप्तर व बास्केट एका ठिकाणी ठेवून दिले.

माझ्या शाळेचा पहिला दिवस असल्याने माझ्या बसच्या मागे मागे माझे आई आणि बाबा शाळेपर्यंत मला सोडण्याकरिता आले.आणि मग शेवटी शाळेची बस ही शाळेच्या आवारात येऊन पोहोचले सर्व विद्यार्थी आपा आपले दप्तर घेऊन आपल्या वर्गाकडे निघाले.

मी शाळेच्या सूचनाफलका पाशी जाऊन माझा वर्ग कोठे आहे ते बघितला आणि वर्गामध्ये गेलो. वर्गामध्ये सर्व जण आनंदाने एकमेका सोबत बोलत होते, सर्वजण उन्हाळ्याची मज्जा आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगत होते.

माझी पण लगेच तेथील विद्यार्थ्यांची ओळख झाली आणि ते माझे चांगले मित्र झाले. नंतर मग वर्गशिक्षक वर्गामध्ये आले.वर्ग शिक्षक हे विनोदी स्वभावाचे होते. वर्गामध्ये येताच त्यांनी सर्वात प्रथम सर्वांना हसवले त्याचबरोबर माझ्या मनामध्ये असलेली शिक्षका विषयी असणारी भीती पूर्ण निघून गेली.

नंतर वर्गशिक्षकांनी सर्वात जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार केला आणि सर्वात जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांला वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले.
आणि अक्षरशः त्या वर्गाचा मला वर्ग प्रतिनिधी करण्यात आले आहे सर्वांनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले.

शाळेचा पहिला दिवस असल्याने कोणत्याही शिक्षकाने काही शिकवले नाही फक्त स्वतःची ओळख आणि विद्यार्थ्यांचा परिचय तेवढाच करून घेतला.आणि मग सर्वांना एका मोहट्या समारंभ हॉल मध्ये बोलवण्यात आले.

मग तिथे एक छोटासा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक आले व त्यांनी सर्वांना शाळेच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व व शाळेबद्दल त्यांनी माहिती दिली नंतर  राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि अशा प्रकारे कार्यक्रम आटोपला.

नंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेत अल्प आहार देण्यात आला कारण याच दिवशी शाळेचा वर्धापन दिवस पण होता. एवढे सर्व आटपून सर्व विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये गेले. त्यानंतर मी मधल्या सुट्टीमध्ये संपूर्ण शाळा बघून आलो. मला शाळा खूपच मस्त वाटली.

 शाळेमध्ये मला सर्वात जास्त काही आवडले असेल तर ते शाळेचे ग्रंथालय आणि शाळेचे क्रीडांगण शाळेच्या ग्रंथालयांमध्ये सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध होती ते बघून मला अतिशय आनंद झाला याशिवाय येथे दररोज येणारे सर्व प्रकारचे मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र होते हे बघून मी येथे यायचे मनाशी ठरवले.

अशा प्रकारे माझा शाळेचा पहिला दिवस झाला आणि शाळेला सुट्टी झाली मग मी बसमध्ये बसून घरी आलो. माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघुन माझ्या घरच्यांना खूपच आनंद झाला, मग मी शाळेतील घडलेले सर्व प्रसंग आई-बाबांना सांगितले.अशा प्रकारे माझा शाळेचा पहिला दिवस होता हा दिवस मला माझ्या आठवणीत सदैव राहील.

तरा होता माझा शाळेतील पहिला दिवस निबंध मराठी | shaletil pahila divas nibandh in marathi   हा निबंध तुम्हाला हा निबंध कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती निबंध हवा असल्यास खाली कमेंट करा धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या