व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी | vyayamache mahatva nibandh in marathi

 vyayamache mahatva nibandh in marathi:आजचे युग हे धावपळीचे युग आहे आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती हा कोणतेही काम करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर करीत आहे.म्हणजेच व्यक्ती हा आपल्या कामाकरिता मोठ्या प्रमाणावर यंत्रावर व तंत्रज्ञानावर अवलंबून झालेला आहे.याचे परिणाम मानवी शरीरावर होऊन मानवाला अनेक प्रकारच्या रोगांचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकारच्या रोगाच्या नियंत्रणासाठी अनेक डॉक्टर आता व्यायामाचा सल्ला देत आहे.त्यामुळे आता सर्व जणांना व्यायामाचे महत्त्व कळलेलेआहे आणि त्यामुळे परिणामी दिवसेंदिवस व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे.

नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी मराठी या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण व्यायामाचे महत्त्व मराठी निबंध | vyayamache mahatva essay in marathi  बघणार आहोत.यामध्ये आपण व्यायाम म्हणजे काय?, व्यायामाचे कोणकोणते प्रकार आहेत व्यायाम केल्यामुळे काय फायदे होतो.याबद्दल माहिती बघणार आहोत तर चला मग सुरु करूया निबंध व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी | vyayamache mahatva nibandh in marathi  

व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी | vyayamache mahatva nibandh in marathi
व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी | vyayamache mahatva nibandh in marathi 

व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी | vyayamache mahatva nibandh in marathi

जगामधील मानवाजवळील सर्वात मौल्यवान अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे त्याचे आरोग्य होय. म्हणून इंग्रजी मध्ये Health is wealth म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती आहे ही प्रसिद्ध म्हण आहे.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जगामध्ये प्रत्येकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतातच.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेकांना व्यायाम हा उपाय सांगितला जातो. भारतामध्ये व्यायामाला प्राचीन काळापासूनच खूप महत्त्व आहे.सकाळी सर्व जण ऋषीमुनी आपल्या कुटीमध्ये आणि विद्यार्थी आपल्या गुरुंच्या आश्रमात जाऊन नियमित व्यायाम करीत असे, म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या किंवा रोग होत नसे,

सुरुवातीच्या काळामध्ये ऋषी-मुनी आपल्या विद्यार्थ्याकडून व्यायाम करून घेत असे.या काळामध्ये मानव हा शारीरिक श्रम मोठ्या प्रमाणात करीत असे व तो स्वतःची कामे स्वतः करीत असे उदाहरणार्थ शेती करणे, नांगरणे, वखरणे पाणी नदीवरून आणने आणि इतर अनेक प्रकारचे कामे करत असे. आणि मुले सुद्धा मैदानात जाऊन मैदानी खेळ खेळत असे  जसे की गिल्ली डंडा, झाडावर चढणे,कुस्ती  इत्यादी यामुळे नकळत त्यांचा नियमित व्यायाम होत असे. यामुळे त्यांचे हे शरीर सुदृढ व बळकट होत असे.

परंतु जशीजशी विज्ञानाने प्रगती केली आणि तंत्रज्ञान अधिक विकसित होत गेले त्यामुळे मानवाच्या अनेक कामे सोपे होऊ लागले.यामध्ये मानवाचे विविध असे परिश्रमाचे कामे यंत्रच करतात यामुळे आणि आजच्या डिजिटल युगात वाढते कम्प्युटरच्या कामामुळे एका जागी बसावे लागत आहे.

या कामांमुळे आता शरीरात कमी प्रमाणात हालचाल होत आहे होते. त्यामुळे मानवाचे शरीर दिवसेंदिवस सुस्थ होत चालले आहे आणि व्यायामाची कमतरता त्यामुळे मानवाला अनेक प्रकारच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे.

आजकालची मुलं हे सर्व कामे आपले संगणकावर करतात संगणकावर ती शिक्षण घेणे, तासन्तास मोबाईल वरती  व्हिडिओ गेम खेळत असणे त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे याचाच परिणाम म्हणून लहानपणी त्यांचे डोळे दुखणे चष्मा लागणे वजन वाढणे इत्यादी समस्या आत्ताच्या मुलांमध्ये दिसत आहे.

या आजकालच्या सर्व आजारावरती या काळात फक्त एकच उपाय आहे ते म्हणजे व्यायाम.व्यायाम म्हणजे शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली होय.

व्यायामाचे अनेक असे फायदे आहे, जर आपण सकाळी उठून लवकर बाहेर फिरायला गेलो तर आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो.याव्यतिरिक्त पायी चालल्यामुळे आपल्या क्षेत्रातील रक्ताभिसरण योग्य रीतीने होते व पायातील मांसपेशी अधिक बळकट होते.

त्यामुळे मानवाचे शरीर अधिक बळकट बनते आणि लवचिक सुद्धा बनते नियमित व्यायामामुळे  मानवाचा मेरुदंड अधिक लवचिक होतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच स्फूर्ती निर्माण होते.

व्यायामाचे पुष्कळसे प्रकार आहे यामध्ये चालणे फिरणे योगासने, मोठ्याने असणे नाचणे, जिम करणे इत्यादी प्रकार असतात.व्यायामाचे प्रकारांमध्ये सर्वोत्तम आसान सूर्यनमस्कार आहे.या एका व्यायामामुळे आपल्या प्रत्येक अवयवाची योग्य रीतीने हालचाल होते.

या व्यायामामुळे मानवी शरीराला आणि प्रकारचे फायदे होतात यामधील सर्वात महत्त्वाचे व्यायामामुळे मानवाचे आयुष्य वाढते.  शरीरातील विषारी घटक सुद्धा व्यायामामुळे कमी केल्या जाऊ शकते.

अनेकांनी व्यायामामुळे दुर्मिळ अशा आजारावरती सुद्धा विजय मिळवला आहे.याचे सर्वोत्तम उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला सर्व परिचित असणारे योग गुरु बाबा रामदेव आहे.रामदेव बाबांनी नियमित व्यायामाच्या भरोशावर लहानपणीच आलेल्या असाध्य अशा आजारावर ती विजय मिळवला.

अशा प्रकारे व्यायामाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.जगामध्ये व्यायामाची जनजागृती होण्याकरिता आणि व्यायामाचे फायदे अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचवण्या करिता 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

जर आपले शरीर जर रोगट असेल तर आपण आनंदाने जगू शकणार नाही. म्हणून आपण नियमित व्यायाम केला पाहिजे.

तर मित्रांनी हा होता व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी | vyayamache mahatva nibandh in marathi    जर तुम्हाला   vyayamache mahatva essay in marathi  हा निबंध आवडला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर सोशल मीडियावर शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा मदत होईल धन्यवाद


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या