Telegram Group

Telegram Group

आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी | marathi nibandh aamchi sahal

  आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी | marathi nibandh aamchi sahal


आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी
aamchi avismarniya sahal nibandh in marathi
aamchi pavsali sahal nibandh in marathi
माझी अविस्मरणीय सहल निबंध मराठी
आमची पावसाळी सहल निबंध
आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी 12वी
मराठी निबंध
शेतावरील सहल निबंध

आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी | marathi nibandh aamchi sahal
आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी 

दरवर्षी प्रमाणे या वर्षी आमच्या शाळेची सहल आयोजित करण्यात आली होती सहल हे नाव ऐकताच सर्वांना खूप आनंद झाला आणि मला जरा जास्तच आनंद झाला कारण या वेळेस सहल जाणार होती ते ठिकाण माझे खूप आवडते ठिकाण होते.

या स्थळाविषयी मी खूप ऐकले आणि वाचले सुद्धा होती आणि या स्थळाविषयी मी खूप माहिती पण गोळा केली होती.

या वर्षी आमच्या शाळेची सहल की केरळ आणि केरळ मध्ये असणारे विविध प्रेक्षणीय ठिकाणी जाणार होती.

सहल येण्याच्या दहा दिवस अगोदरच सरांनी सहलीची माहिती दिली होती त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्याप्रमाणे माझे सुद्धा मन सहलीच्या कल्पनेत गुंग होते. आणि अभ्यासात जरा थोडे कमीच लक्ष लागत होते.

सर्व विद्यार्थी सहलीसाठी अतिशय उतावळे झाले होते. शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी या एकमेकासोबत फक्त सहली याच विषयावर बोलत होते.मी पण सहलीमध्ये असतांना हे करायचे ते करायचे. तिकडे जायचे तिकडे फिरायचे अमक्या वस्तू विकत घ्यायच्या विविध पदार्थ खायचे, इत्यादी सर्व मी माझ्या मित्रांबरोबर चर्चा करत होतो.

शाळेमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते जसाजसा सहलीचा दिवस जवळ येत होता. तसा तसा मला खूपच आनंद होत होता.

सहल येण्याच्या चार-पाच दिवस आगोदरच मी सहलीची संपूर्ण तयारी केली होती यामध्ये मी सहलीची साठी लागणारे कपडे, बॅग, बॉटल आणि माझे सर्व ओळखपत्रे आणि महत्वाचे नकाशे एका बॅग मध्ये ठेवले.

याबरोबरच सोबत मी एक कॅमेरा फोटो काढण्यासाठी घेतला.व मी एक दूरच्या वस्तू बघण्यासाठी दुर्बिन पण सोबत घेतली होती.

सहलीला जाण्याकरिता माझ्या आईने पण मला खूप मदत केली माझ्या आईने मला सहली मध्ये खाण्यासाठी छान छान पदार्थ तयार करून दिले होते.

शेवटी सहलीचा तो दिवस आला आणि मी सकाळी लवकरच उठून तयारी करून आमच्या शाळेच्या आवारात पोहोचलो.माझ्याप्रमाणेच बाकी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सर्वजण वेळेवर उपस्थित झाले होते सर्वजण सहलीला जाण्या करिता एकदम उत्सुक होते.त्यानंतर सरांनी आमची सर्वांची हजेरी घेतली आणि सहली विषयी गरजेच्या असणाऱ्या आम्हाला काही सूचना देऊन,मग आम्हाला आपल्या सहकार्या सोबत बसमध्ये बसायला लावले आणि श्री गणेशा म्हणत आमच्या सहलीला सुरुवात झाली.

सहलीला जात असताना सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी होती प्रवास हा खूप मोठा असल्याने आम्ही सर्वजण बस मध्ये गाण्याच्या,भेंड्या,नाव गाव वस्तू प्राणी तेथील प्रसिद्ध ठिकाण. असे अनेक विविध खेळ खेळलो हे खेळ सर्वांबरोबर खेळताना आम्हाला खूपच मजा आली.

मी आणि माझे मित्रांनी सहलीला जात असताना बसमध्ये ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणाचे अनेक व्हिडीओ मोबाईल वरती बघितले. आणि त्या स्थळाबद्दल ची सर्व माहिती आम्ही मिळवली. मोबाईल मध्ये ते सुंदर व्हिडिओ बघून मला कधी आपण त्या ठिकाणी पोहोचतो असे झाले होते. आणि मग शेवटी केरळ म्हणजे आमच्या सावलीच्या ठिकाणी पोहोचलो.

केरळ मध्ये शिरताच एक मला नवीनच वातावरण बघायला मिळाले. एकदम निसर्गरम्य वातावरण होते, सर्वीकडे हिरवळ मोठमोठाले झाडे आणि तेथील लोक आणि त्यांचे राहणीमान बघून, तेथील संस्कृती बघून मला खूपच छान वाटले.

त्यानंतर आम्ही खेळ मधील कोच्ची या ठिकाणी पोहोचलो याच ठिकाणी आमची सहल होती.कोच्ची हे शहर खूपच सुंदर शहर होते. आमच्याबरोबर तिथे अनेक पर्यटक सुद्धा पर्यटनासाठी आले होते. कोची हे शहर निसर्गाच्या सानिध्यात एका समुद्राच्या तटावरती आहे.

रात्र झाली होती सर्वजण दिवसाच्या खूप मोठ्या प्रवासाने खूपच थकून गेले होते. मग आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी आलो आमचे राहण्याचे ठिकाण बघून तर आम्ही सर्वजण अधिकच को चालू होते हॉटेल बघून आणि त्या हॉटेलमधल्या रूम बघून आम्ही स्वप्नात तर नाही तसे आम्हाला भासू लागले.सगळीकडे स्वच्छता. सुंदर सजावट लाइटिंग आणि तेथील प्रेमळ स्वभावाचे कर्मचारी यामुळे आम्हाला खूपच प्रसन्नता वाटली. मग आम्ही सरांनी सांगितल्या प्रमाणे आमच्या रूम मध्ये गेलो. कुटुंबामध्ये केल्यानंतर सर्वात आधी मस्तपैकी आंघोळ केली आणि मग तेथील नरम गादीवरती मी मनसोक्त झोपलो.

त्यानंतर सर्वांना रात्रीचे जेवण करण्याकरिता एकत्र बोलविण्यात आली. केरळमधील विविध पदार्थ खाऊन खूपच मस्त वाटले. तेथील जेवण वाढण्याच्या पारंपारिक पद्धतीमुळे एक वेगळाच अनुभव आला.

दुसर्‍या दिवशी आम्ही सर्व जण कोची मधील एका इतिहासिक ठिकाणी आलो. ते ठिकाण म्हणजे मट्टनचेरी पैलेस होय.ते पॅलेस बघून मला तर खूपच आश्चर्य वाटले ते पॅलेस खरोखरच अतिशय खूपच सुंदर होते तेथे निरनिराळ्या वस्तू आणि कलाकृती चे संग्रह आम्हाला बघायला मिळाले. तेथील सर्व माहिती आम्ही गोळा करूननंतर आम्ही तेथून फोर्ट-कोच्चि या शहराला भेट दिली.हे शहर फिरत असताना सरांनी याबद्दलची आम्हाला सर्व माहिती सांगितली मग आम्ही कोची येथील मुख्य आकर्षण म्हणजे चिनी मत्स्यपालन जाळ्यावर पाशी आलो.

या स्थळाला चैनी वाल्या नावानेसुद्धा ओळखतात हे स्थळ केरळ येथील संस्कृति दर्शवते. तेथे आम्ही मासे कसे पकडले जातात आणि मासे पकडण्याचा अनुभव आम्ही घेतला. तो अनुभव माझ्या आयुष्यभर लक्षात राहील.त्यानंतर आम्ही विलिंगडन आइलैंड या द्वीप वर आलो.या द्वीपवर आम्ही सर्वांनी बोटने प्रवास केला. बोटमध्ये माझी प्रथमच वेळ होती. त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती.  बोटमध्ये प्रवास करताना त्या स्थळाविषयी तेथील संस्कृती विषयी सर्व माहिती आम्हाला आमच्या सरांनी दिली. व तेथील असणाऱ्या किनाऱ्यावर आम्ही मनसोक्त खेळलो.

आता आमच्या सहलीचा शेवटचा दिवस होता आम्ही शेवटच्या दिवशी मंगलवनम बर्ड सेंचुरी. या पक्षी अभयारण्यास भेट दिली. तेव्हा यांना खूपच मोठे होते. तेथे आम्ही निरनिराळ्या पक्षांच्या जाती, विविध प्रकारचे झाडे आणि एक झिल बघितली.

त्यानंतर कोची सनसेट रुजू बघून पुन्हा हॉटेलवर परत आलो. हे सुर्यास्ताचे दर्शन खूपच नैसर्गिक आणि अविस्मरणीय होते. ते सूर्यास्ताचे नैसर्गिक सौंदर्य मी माझ्या कॅमेरा मध्ये कैद केले.

केरळमधील प्रत्येक गोष्टी आम्हाला खूपच आवडली होती तेथील नैसर्गिक सौंदर्य,संस्कृती प्रेमळ लोक आणि जेवण वाढण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे जेवणाचा आनंद द्विगुणित झाला.

अशा प्रकारे आमची सात दिवसाची सहल आटपवून आम्ही पुन्हा मायभूमीत परत आलो होतो. पण मन अजूनही केरळमध्येच होते. अशी ही माझी अविस्मरणीय सहल मला आयुष्यभर आठवणीत राहिल धन्यवाद.

आमची अविस्मरणीय सहल वर निबंध तुम्हाला हा निबंध कसा वाटला खालील कमदी नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर जर निबंध हवा असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

 1. Mast aahe  Ajun पहाटेचे सौंदर्य या वर निबध पाहिजे

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल तूम्हाला पहाटेचे सौंदर्य या वर निबध लवकरात लवकर मिळेल

  उत्तर द्याहटवा
 3. मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध लिहा ना

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद, तूम्हाला मराठी भाषेचे महत्त्व यावर लवकरात लवकर निबंध उपलब्ध करू अधिक माहिती साठी telegram channel join करा

   हटवा