मी झाड बोलतोय मराठी निबंध | झाडाची आत्मकथा | Zadachi atmakatha in marathi

 मी झाड बोलतोय मराठी निबंध | झाडाची आत्मकथा | Zadachi atmakatha in marathi

mi zad boltoy marathi nibandh:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामद्धे आज आपण मी झाड बोलतोय म्हणजेच झाडाचे आत्मवृत Zadachi atmakatha in marathi हा मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधमद्धे एक झाड एका विद्यार्थ्याशी बोलतांना दाखवले आहे.जर झाड बोलू लागेल तर काय बोलेल. हे या निबंधमद्धे सांगण्यात आले आहे .तर चला मग सुरू करूया मी झाड बोलतोय Zadachi atmakatha in marathi हा निबंध. 

मी झाड बोलतोय मराठी निबंध | झाडाची आत्मकथा | Zadachi atmakatha in marathi
मी झाड बोलतोय | Zadachi atmakatha in marathi

मी झाड बोलतोय | mi zad boltoy marathi nibandh 

शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या मी दररोज प्रमाणे आजही मैदानात पतंग उडवायला गेलो होतो.पतंग मस्त आकाशात घिरट्या घालून उडत होते की. पण हवेच्या जास्त प्रवाहाने माझ्या पतंगीचा धागा तुटला आणि पतंग उडत उडत जाऊन एका मोठ्या झाडावर ती जाऊन अडकली, 

मी पतंग च्या मागे धावता-धावता च्या झाडापाशी येऊन पोहोचलो,आणि त्या झाडावर ती माझी पतंग मी काढण्याचा प्रयत्न करीतच होतो किंवा तेवढ्यात मला एक भारी भरकम आवाज आला.मला वाटले की कोण बोलत आहे पण मी नीट बघितले असता तेव्हा मला माझ्या लक्षात आले की ते झाडच माझ्या सोबत बोलत होते. 

मग ते झाड बोलू लागले आणि त्याचे बोलणे मी ऐकू लागलो. नमस्कार मित्रा मी झाड बोलत आहे.मला तर तू ओळखतोस ना माझा जन्म हा खूप ९५ वर्षांपूर्वी झाला आहे. जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासूनच माझे अस्तित्व पृथ्वीवर आहे.

तुझ्याच पर्जोबांनी मला इथे लावले होते ते माझी रोज काळजी घेत असे, त्यांनी मला मी लहान असताना छान कुंपण वगैरे घातले होते.ते माझे गुरा ढोरा पासून संरक्षण करीत असे तुझे पर्जोबा आम्हाला रोज पाणी देत असे त्यांच्यासोबत तुझे आजोबा पण येत असे. 

तुझ्या पर्जोबा नंतर त्यांची माझी काळजी घेतली.जसा जसा मी मोठा होत गेलो तसतसे माझे एका छोट्या रोपामधून एक विशाल वृक्ष तयार झाले. परंतु तुझ्या आजोबाच्या आजारपणामुळे आता ते माझी काळजी घ्यायला येत नाही पण असो.

मित्रा मी झाड बोलत आहे पृथ्वीच्या पर्यावरणामध्ये माझे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मी सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असे पर्यावरणा मध्ये ऑक्सिजन पुरवतो. माझ्यामुळे तुम्ही सर्व सजीव जिवंत आहे. 

माझ्याच मुळेच निसर्गचक्र एकदम सुरळीत चालते.मी पर्यावरणातील हानीकारक आणि विषारी असे कार्बन-डाय-ऑक्‍साईड स्वतःमध्ये सामावून घेतो आणि त्याबदल्यात पर्यावरणाला म्हणजेच वातावरणामध्ये शुद्ध असे ऑक्सिजन पुरवतो.एवढेच नाही मित्रा माझा उपयोग मानव हा अगदी आपल्या  सुरुवातीच्या काळापासून करत आला आहे.

सुरुवातीच्या काळात म्हणजे अश्मयुगात जेव्हा कपड्याचा शोध लागायचा होता तेव्हा मनुष्य माझे पाने तोडून आपल्या अंगावरति गुंडाळत असे.आणि जेव्हा मानव प्राणी हा थोडा विकसित झाला आणि त्याला घराची राहण्यासाठी गरज भासू लागली तेव्हा तो माझ्या फांद्या तोडून आपल्यासाठी राहण्याकरिता माझ्यापासूनच निवारा बनवतअसे.कधीकधी तर जंगली प्राण्याच्या भीतीमुळे आणि त्यांच्यापासून संरक्षण होण्याकरीता मनुष्य झाडावरती आपले घर बांधत असते.

अशाप्रकारे मी सुरुवातीच्या काळात मानवाच्या उपयोगी येत असेल म्हणून मला खूप आनंद व्हायचा.माझा उपयोग एवढेच नाही तर माझा उपयोग हा विविध औषधे बनवण्यासाठी होतो. आयुर्वेदामध्ये तर मला खूपच मानले जाते. 

माझ्या मुळे कित्येक लोकांचे असाध्य असे त्याचे आजार बरे होते आणि जेव्हा ते लोक मला धन्यवाद कसा तेव्हा मला अतिशय चांगले वाटते.आणि या सोबतच मित्रा माझा उपयोग हा तुम्ही जे ज्ञान मिळवण्यासाठी बुक,पुस्तके वापरतात ते सुद्धा माझ्या पासूनच तयार होतात.आणि तुमच्या घरा मध्ये असणारे फर्निचर सुद्धा माझ्या पासून तयार केले जाते एवढे सर्व आणि या व्यतिरिक्त अजून खूप सारे उपयोग आणि फायदे मानवाला माझ्यामुळे होते.

परंतु मानव हा प्राणी आता दिवसेंदिवस स्वार्थी बनत चाललेला आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावलेला आहे. नवनवीन यंत्र विकसित केले आहे.अनेक मोठमोठ्या इमारती बनवण्यासाठी हजारो झाडांची मोठ्या निर्दयपणे कत्तल होते.

विविध प्रकारचे कारखाने,कंपन्या, मॉल सिनेमागृह, उभारण्यासाठी माझी कोणतीही पर्वा न करता जंगलाच्या जंगले मानवाने उध्वस्त केली आहे. म्हणून मला खूप भीती वाटते मला पण कोणी कधी ,कोणत्याही क्षणी तोडून टाकेल. फर्निचर तयार करण्यासाठी,विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू बनवण्याकरिता माझी मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. 

यामुळे मला अतिशय दुःख होते.अशा या मानवाच्या स्वार्थी वृत्ती मुळे जगामध्ये झाडांची संख्या कमी होत चाललेली आहेत आणि मोठ्या इमारतींची संख्या जास्त झाली आहे,

पहिलेच्या काळामध्ये झाडांचे मोठे जंगल असायचे परंतु आत्ता कारखाने,इमारतीचे जंगल सर्वीकडे झाले आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये तर क्वचितच मोठे झाड बघायला मिळते. अशा या मानवाच्या वागण्यामुळे कित्येक अशा दुर्मिळ असणाऱ्या प्रजातीची झाडे नष्ट झाली आहे आणि काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे.

झाडांच्या कत्तलीमुळे झाडावरती राहणाऱ्या प्राण्या पक्षांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे अनेक पक्षी आता नाहीसे होत चाललेले आहे. असाच जर मनुष्य वागत राहिला तर एक दिवस पृथ्वीवरील सर्व झाडे नष्ट होऊन जाईल. आणि याचाच परिणाम तुम्हा मनुष्याला भोगावा लागणार आहे. 

पर्यावरणामध्ये झाडाच्या दिवसेंदिवस होणारे कमी प्रमाण यामुळे वातावरणात मोठे बदल आज आपल्याला बघायला मिळतात.परंतु मित्रा आता ही वेळ गेलेली नाही जर प्रत्येक मनुष्याने आपापल्या घरी मनुष्य एक घर एक झाड असा निश्चय केला तर पर्यावरणाला नक्कीच मदत होईल. आणि झाडांची सुद्धा संख्या वाढेल म्हणून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे.

आणि हो मित्रा फक्त झाड लावून चालणार नाही तर त्याची काळजी पण घेतली पाहिजे.आणि आता सरकार पण पृथ्वीवरील वातावरणातील बदल बघून दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा ही योजना राबवत आहे. त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे आणि पर्यावरणा मधील माझी संख्या वाढवली पाहिजे. एवढे बोलून ते झाड शांत झाले.

नंतर माझी पतंग काढून मी घरी आलो आणि एक छोटे झाड लावले आता मी त्या झाडाचे संगोपन करीत आहोत धन्यवाद.

तर हा होता निबंध मी झाड बोलतोय | mi zad boltoy marathi nibandh म्हणजे झाडाची आत्मकथा.Zadachi atmakatha in marathi निबंध, तुम्ही तुमच्या घरी झाड लावले आहे का? आणि झाड जर लावले असेल तर कोणते झाड लावले खाली कमेंट मध्ये नक्की सांगा.हा निबंध तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करू शकता आणि
तुम्हाला हा निबंध कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या