नाग पंचमी ची माहिती मराठी 2021 | nag Panchami information in Marathi

 नाग पंचमी ची माहिती मराठी 2021 | nag Panchami information in Marathi nag panchami chi mahiti in marathi 

In this article we will know about nag Panchami information in Marathi. If you are searching for the nag Panchami information in Marathi then this article for you.

नागपंचमी ची माहिती मराठी 2021:भारत देश विविधतेने नटलेला देश आहे आपल्या देशाला जगामध्ये सणांचा देश म्हणून सुद्धा ओळखले जाते सणांचा महिना म्हणून ओळखला जाणार्‍या श्रावण महिन्यात विविध सण साजरे केले जातात .त्यामध्ये नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातला पहिला सण आहे नागपंचमी हा सण महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारताबरोबर मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो

आजच्या लेखामध्ये आज आपण नागपंचमी विषयी माहिती बघणार आहोत यामध्ये नागपंचमी कधी आहे नागपंचमी चा मुहूर्त कधी आहे आणि पूजा विधी याबद्दल माहिती घेणार आहोत चला मग बघू या नागपंचमी या सणाबद्दल माहिती 

यावर्षी नागपंचमी कधी आहे?

नागपंचमी २०२१ मध्ये हा 13 ऑगस्ट २०२१ ला वार शुक्रवार या दिवशी आहे.


पंचमी या तिथीची सुरुवात

12 ऑगस्ट २०२१ ला तीन वाजून पंचवीस मिनिटाला पंचमी तिथीची सुरुवात होईल.


पंचमी तिथीचा शेवट.

पंचमी तिथीचा शेवट १३ ऑगस्ट २०२१ ला दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी आहे


नागपंचमीच्या शुभ मुहूर्त

नागपंचमीच्या शुभ मुहूर्त यावर्षी सकाळी  05:49 पासून ते 08:28 पर्यंत आहे.


नागपंचमी या सणाविषयी माहिती नाग पंचमी ची माहिती मराठी 2021 | nag Panchami information in Marathi 

nag panchami chi mahiti in marathi: सण-उत्सवाचा महिना म्हणजे श्रावण महिना या महिन्याच्या पहिला सण म्हणजे नागपंचमी हा सण होय.

नागपंचमीचा सण श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी येतो म्हणून या सणाला श्रावण पंचमी असेसुद्धा म्हणतात.

शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या नागाबद्दल प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्राचीन काळापासून नागपंचमी हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रावण महिन्यात साजरा करण्यात येतो.

वेदकाळापासून चालत आलेला आहे खूपच महत्त्वाचा मानला जातो.

नागपंचमी म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस.

नाग या प्राण्याबद्दल समाजामध्ये आदर आणि प्रेम भावना निर्माण करण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे.

या दिवशी नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केली जाते या दिवशी नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी घरोघरी नागदेव तिथे प्रतिमेचे पूजन केले जाते.

नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठून सर्वत्र साफसफाई सडा-सारवण करून अंगना मध्ये रांगोळी काढतात.

त्यानंतर स्त्रिया एकत्र येऊन नवीन पारंपारिक वस्त्रालंकार घालून आणि विविध प्रकारच्या हातावरची मेहंदी काढून नागदेवतेची पूजा करतात.

नागपंचमी या सणाला नागदेवतेला नैवद्य म्हणून लाया फुटाणे व  दूध दाखवली जाते.

या दिवशी गव्हाची खीर चण्याची डाळ आणि गूळ यापासून उकडीची पुरणाची दिंड बनवली जाते व याबरोबरच पुरणपोळीचा सुद्धा बेत असतो.

नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया व लहान मुली फुगडी घालतात झाडाला झोके घेतात. आणि नागाच्या ना वारुळा पाशी विविध प्रकारचे गाणी गातात.

स्त्रियांसाठी नागा आपल्या भावाप्रमाणे असतो म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करतात.

नागपंचमी या सणाविषयी समाजामध्ये जागृती पसरवण्यासाठी साजरा केला जातो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या सापाचे दिवसेंदिवस प्रमाण पर्यावरणात कमी होत चालले आहे ज्याप्रमाणे शेतकरी या सापाला मारत नाही त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचत नाही त्याचप्रमाणे आपण सुद्धा सापाचे संरक्षण केले पाहिजे.

जर कुठे साप निघाला तर सर्प मित्रांच्या मदतीने त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून देणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे. तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या