Telegram Group

Telegram Group

नागपंचमी सण वर निबंध मराठीत | nag panchami nibandh marathi

नागपंचमी सण वर निबंध मराठीत | nag panchami nibandh marathi 

             
नागपंचमी सण वर निबंध मराठीत | nag panchami nibandh marathi
Nagpanchami nibandh marathi 

nag panchami nibandh marathi:भारतामध्ये अनेक जाती पंथाचे लोक मोठ्या आनंदाने मिळून मिसळून राहतात. भारतामध्ये सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केली जाते. होळी दिवाळी दसरा त्याप्रमाणे अनेक असे सण भारतामध्ये साजरे केले जातात. नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आज आपण नागपंचमी वर निबंध बघणार आहोत.

नागपंचमी सण वर निबंध मराठीत | nag panchami nibandh marathi 

नागपंचमी निबंध लेखन मराठीत:नागपंचमी हा सण महाराष्ट्र बरोबर संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी असतो. नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांनी येतो. म्हणून या सणाला श्रावण पंचमी असेसुद्धा म्हणतात.

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची  पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागाची नागाची पूजा करून नागदेवतेला देवतेला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. 

नागपंचमी हे खेड्याप्रमाणे शहरातही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.नागपंचमीच्या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठतात. सकाळी
लवकर उठून झाडून पुसून सर्वत्र स्वच्छता करतात. त्यानंतर सकाळी अंघोळ करून अंगणामध्ये रांगोळी घातली जाते.

ग्रामीण भागामध्ये सर्व स्त्रिया एकत्र होऊन पारंपारिक वेशभूषा करून बाहेर असणाऱ्या नागाच्या वारुळा जवळ जाऊन तिथे पूजा करतात. किंवा घरामध्ये पाटावरती नागाची मूर्ती बसून त्याची पूजा करतात.

नागदेवतेची पूजा करीत असताना त्यांना लाह्या, फुटाणे, आखाडे वाहतात.ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागात सुद्धा नागपंचमी मोठ्या आनंदाने साजरी केली जातात.

नागपंचमीच्या दिवशी शहरी भागांमध्ये नागाचे व त्याच्या पिल्लाचे चित्र हे कागदावर ती काढून नागदेवतेची पूजा केली जाते. किंवा नागाचे चित्र याची सुद्धा पूजा केली जाते.

नागपंचमीच्या दिवशी नागाची या फोटोला लाह्या ची पुतण्याची माळ घालतात. आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवितात.अशा प्रकारे घरोघरी नागपंचमी व आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते.

नागपंचमीच्या दिवशी घरोघरी गव्हाची खीर, चण्याची डाळ आणि गुळ यापासून बनवलेली उकडीची दिंड्या तयार केली जाते. नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळी चा सुद्धा बेत असतो.

नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून हातावरती मेंदी काढून, झाडावरती झोके घेतात आणि फेर धरून नागपंचमीची विविध गाणी गातात. फुगड्या  खेळतात.

नागपंचमीचा सण हा मुख्यत्वे नागाच्या प्रति प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी व त्याच्या सन्मानासाठी साजरा केला जातो.

नागाबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा सन साजरा केला जातो. नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. कारण तो शेतामध्ये उपद्रवी असलेले उंदीर कीटक खाऊन शेतकऱ्याची मदत करतो.

म्हणून नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची खोदकाम नांगरणी वखरणी अशा प्रकारचे कोणतेही काम करत नाही.

पर्यावरणातील सापांचे संरक्षण करणे हा या सणामागील मुख्य हेतू आहे. दिवसेंदिवस सापांची संख्या पर्यावरणास कमी होत चाललेली आहे. आपल्या कडे साप निघाला असता त्याला न मारता सर्पमित्राला बोलवून त्याला योग्य ठिकाणी सोडून देणे हे आपण केले पाहिजे.

प्रेमाने आपल्याला कोणालाही जिंकता येते हे नागपंचमी सण आपल्याला शिकवते.

समाप्त

तर हा होता नागपंचमी निबंध मराठीमध्ये, जर तुम्हाला हा नागपंचमी सण वर निबंध मराठीत | nag panchami nibandh marathi  आवडला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. जेणेकरून मदत होईल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या