संवादलेखन मराठी | संवाद लेखन म्हणजे काय ? | samvad lekhan in marathi

 संवादलेखन मराठी |  samvad lekhan in marathi  

नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी मराठी या ब्लॉग तुमचे सहर्ष स्वागत आहे.आजच्या या लेखामध्ये आज आपण उपयोजित लेखन या घटकांमधील संवाद लेखन samvad lekhan in marathi या घटकाचा अभ्यास करणार आहोत.

 संवाद लेखन मराठी मध्ये यामध्ये संवाद म्हणजे काय? संवाद लेखन कसे करावे संवाद लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी आणि सर्वात शेवटी संवाद लेखन यामधील काही उदाहरणे बघणार आहोत तर चला मग सुरु करूया संवाद लेखन

संवाद म्हणजे काय? 

तर मित्रांनो संवादलेखन करताना सर्वात आधी आपल्याला संवाद म्हणजे काय हे माहिती असणे गरजेचे आहे तर संवाद म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती मध्ये होणाऱ्या बोलण्याला संवाद असे म्हणतात.

संवाद हा शब्द दोन शब्दापासून तयार केलेला आहे.

संवाद = सम् + वाद.

संवाद हा शब्द वाद या मुळे शब्दांमध्ये सम् हा उपसर्ग लावल्याने संवाद शब्द तयार झालेला आहे.

संवाद या शब्दाचा सोपा अर्थ सांगायचा झाला तर एकमेकांशी बोलणे होईल.

संवादाद्वारे आपण आपल्यातील विचार व भावना व्यक्त करू शकतो. एकमेकाची बोलणे हा संवाद या शब्दाचा अर्थ होतो.

संवाद यामध्ये दोन आणि त्यापेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असतात. कधीही संवाद आहेत त्या व्यक्तीमध्ये होत नसतो.

मराठी भाषेमध्ये संवाद साधणे यासाठी सुद्धा संवाद शब्द वापरला जातो.

संवाद लेखन म्हणजे काय?

एखाद्या विशिष्ट विषयावर दोन किंवा अधिक लोकांनी, व्यक्तींनी केलेली सुसंगत संभाषण जेव्हा लिहिले जाते तेव्हा त्यास संवादलेखन असे म्हणतात.

म्हणजेच दोन व्यक्तीतील बोलणे लिहिणे याला सुद्धा संवाद लेखन असे म्हणतात.

संवाद दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती मध्ये होत असतो परंतु परीक्षेमध्ये दोन व्यक्ती मधील संवाद लिहिणे अपेक्षित असते.

काही वेळेस एखाद्या विशिष्ट विषयावर निर्णय घेण्यासाठी निश्चित दिशेने सूत्रानुसार बोलणे होते अशा प्रकारचा संवाद अभ्यासक्रमात अपेक्षित आहे.

संवादलेखन करतेवेळेस आपण दोन व्यक्ती मधील संवाद जसेच्या तसे लिहू शकतो.पण कधीकधी संवाद लिहिणे हे काल्पनिक सुद्धा असू शकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या