पाऊस आणि छत्री यांच्यामधील संवाद लेखन मराठी | samvad lekhan in marathi between rain and umbrella

 पाऊस आणि छत्री  यांच्यामधील संवाद लेखन मराठी | rain and umbrella conversation in marathi | samvad lekhan in marathi between rain and umbrella 

पाऊस आणि छत्री संभाषण :नमस्कार आजच्या या लेखामध्ये आज आपण संवाद लेखन मराठी याचे उदाहरण बघणार आहोत.म्हणजेच आपण एक संवाद बघणार आहोत.

 
हा संवाद पाऊस आणि छत्री  या मध्ये झालेला आहे. तर चला मग बघूया पाऊस आणि छत्री  यांच्यामधील संवाद लेखन मराठी | rain and umbrella conversation in marathi ,samvad lekhan in marathi between rain and umbrella
 

पाऊस आणि छत्री संभाषण  rain and umbrella conversation in marathi
पाऊस आणि छत्री संभाषण  rain and umbrella conversation in marathi


पाऊस आणि छत्री यांच्यामधील संवाद लेखन मराठी | conversation between rain and umbrella in Marathi samvad lekhan in marathi between rain and umbrella 


पाऊस: अग छत्री ताई कशी आहेस तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी

छत्री: पाऊस दादा तू आज काल जरा जास्तच जोमात भरतोय तुझी तब्येत फारच छान दिसतेय

पाऊस: तसं काही नाही ग पाणी बरसवणे हे माझे कर्तव्यच आहे मी जोमाने बरसणार तरच ही सजीवसृष्टी सुरळीत चालणार ना.

छत्री:हो अगदी बरोबरच आहे.

पाऊस :पण मला कधीकधी भीती वाटते मी मी जेव्हा टपोऱ्या थेंबांचा वर्षाव करतो तेव्हा तुला काही इजा तर होत नाही ना.

छत्री:नाही रे दादा उलटे मला तर पावसाळ्याच्या पाण्यात भिजणे फार आवडते. मग तो टपोऱ्या थेंबाचा असो वा हलक्‍या सरी.

पाऊस:बरं मला छान वाटलं तुला भिजायला आवडते हे ऐकुन, छत्री ताई एक सांगू काय तुला

छत्री :सांग ना रे पाऊ स दादा 

पाऊस तू माणसाच्या संरक्षणासाठी तुझं कर्तव्य मोठ्या नेमाने पार पडते त्याचा मला फार अभिमान वाटतो.

छत्री: धन्यवाद तू जसं तुझं कर्तव्य पार पाडतो तसं मी सुद्धा माझं कर्तव्य पूर्ण करते त्यात अभिमान कसला.

पाऊस :पण कधी कधी माणूस तुझी हेळसांड करतो तुझी योग्य काळजी करत नाही तेव्हा मला फार वाईट वाटते ग

छत्री:हो ना या गोष्टीच मलाही वाईट वाटतं तू जेव्हा जेव्हा येतो तेव्हा माणसाला माझी गरज वाटते नंतर माझ्या कडे कोणी लक्षही देत नाही.

पाऊस: हो खरंच आहे, मी नसताना तुझे हाल होतात हे मी सुद्धा आकाश दादा कडून ऐकलंय

छत्री:जाऊदे रे दादा माणसाच्या स्वभावातच आहे ते. ते म्हणतात ना कामापुरता मामा
(हे ऐकून दोघेही हसायला लागले)
समाप्त

तर हे पाऊस आणि छत्री या दोघांमधील संवाद लेखन मराठी, तुम्हाला हे पाऊस आणि छत्री  यांच्यामधील संवाद लेखन मराठी | rain and umbrella conversation in marathi ,samvad lekhan in marathi between rain and umbrella आवडले असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा.



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या