वाचन प्रेरणा दिन बातमी लेखन मराठी | vachan prerna din batmi lekhan in marathi

 वाचन प्रेरणा दिन बातमी लेखन मराठी | vachan prerna din batmi lekhan in marathi

वाचन प्रेरणा दिन वृत्तांत लेखन मराठी: नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये  बातमी लेखन या प्रकारातील आजपण एक बातमी लेखन तयार करणार आहोत. व  ते बातमी लेखन म्हणजे  वाचन प्रेरणा दिन बातमी लेखन मराठी /वृत्तांत लेखन आहे. हे लेखन वर्ग आठ ते दहा चे विद्यार्थी आपल्या अभ्यासासाठी वापरू शकता तर चला बघूया वाचन प्रेरणा दिन बातमी लेखन मराठी /वृत्तांत लेखन मराठी

vachan prerna din batmi lekhan in marathi/ vachan prerna din report writing in marathi ही बातमी लेखन तयार करताना तुम्हाला खालीलप्रमाणे प्रश्न दिले जाईल

वाचन प्रेरणा दिन बातमी लेखन मराठी | vachan prerna din batmi lekhan in marathi,vachan prerna din vrutant lekhan in marathi
vachan prerna din batmi lekhan in marathi

वाचन प्रेरणा दिन बातमी लेखन मराठी | vachan prerna din batmi lekhan in marathi

प्रश्न ; तुमच्या विद्यालयात साजरा झालेला वाचन प्रेरणा दिन बातमी लेखन 

वेदधरिणी विद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्सवात साजरा 

दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी वेदधरिणी विद्यालयांमध्ये सकाळी दहा वाजता थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे निमित्त साधून वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील वरिष्ठ प्रसिद्ध संशोधक याचे एस एम राऊत कार्यक्रमाला उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. यावेळी वर्ग पाच ते दहा चे विद्यार्थी तसेच संपूर्ण शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दीपप्रज्वलन केले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये भाषण व कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व तसेच आयुष्यामध्ये  होणारे वाचनाचे फायदे यावर व्याख्यान केले.शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जेवणातील संघर्षाबद्दल तसेच संशोधनाबद्दल माहिती दिली आणि वाचन प्रेरणा दिन का साजरा केला जातो याविषयी मार्गदर्शन केले. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या पासून प्रेरणा घेण्याची त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना आवाहन केले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यालयांमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर कलाम यांच्या विषयी निरनिराळे पुस्तकात तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ व पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्याकरिता उपलब्ध करण्यात आले होते.

विद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षिका स्मिता परडके मॅडम यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे आभार व्यक्त केले आणि राष्ट्रगीताने विद्यालयातील वाचन प्रेरणा दिवस याचे समारोप करण्यात आले.

समाप्त 

बातमी क्रमांक 2:वाचन प्रेरणा दिन बातमी लेखन मराठी /वृत्तांत लेखन मराठी  | vachan prerna din batmi lekhan in marathi 

 डॉक्टर यशवंतराव चव्हाण विद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम

दी १५. ऑक्टोबर नागपूर येथील डॉक्टर यशवंतराव चव्हाण विद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार द्वारे सन्मानित जिल्ह्यातील नामांकित शाळेचे मुख्याध्यापक आर आर रमेश उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

वाचन दिनानिमित्त कार्यक्रमांमध्ये वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये विविध विद्यार्थ्यांनी  भाषणे सादर केली. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगताना  पुस्तके कशाप्रकारे आपल्या जीवनात उपयोगी ठरू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती दिली. वाचन ही काळाची गरज आहे व नियमित रोज पाच पाने वाचन करावे असे आवाहन सुद्धा केले.

वकृत्व स्पर्धेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले यावेळी मंचावर सचिव अध्यक्ष व प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यानंतर शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका श्रीमती वनिता पाटील यांनी सगळ्यांचे लाभलेल्या  सहकार्याबद्दल व शांततेने उपस्थितीबद्दल आभार व्यक्त केले. सोबतच विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वाटप करण्यात आले. आणि शेवटी राष्ट्रगीत घेऊन वाचन प्रेरणा दिन हा कार्यक्रम आनंदात पार पडला

समाप्त 

तर हे होतं वाचन प्रेरणा दिन बातमी लेखन मराठी | vachan prerna din batmi lekhan in marathi जर तुम्हाला vachan prerna din report writing in marathi ही बातमी लेखन आवडले असेल यावर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा आणि जर तुम्हाला कोणत्या विषयावर बातमी लेखन हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा. तुम्हाला जर बातमी लेखन म्हणजे काय हे माहीत नसेल तर आम्ही यावर एक पहिलेच लेख लिहिला आहे ते तुम्ही नक्की बघा.जर तुम्हाला ही बातमी लेखन आवडली असेल तरी आपले मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या