डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी 2024 | dr babasaheb ambedkar speech in marathi.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण | dr.babasaheb ambedkar information in marathi speech | dr babasaheb ambedkar jayanti 2024 speech in marathi

dr babasaheb ambedkar jayanti speech in marathi:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आज आम्ही 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भाषण मराठी  dr babasaheb ambedkar bhashan marathi तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. त्यानिमित्ताने सर्व शाळा कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भाषण दिले जाते.म्हणूनच आम्ही तुमच्या साठी अगदी सोप्या भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी babasaheb ambedkar bhashan marathi तयार केले आहे.

हे भाषण तुम्ही आपल्या महाविद्यालयात कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये याचा उपयोग करू शकतात तर चला मग बघू या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण.dr babasaheb ambedkar jayanti speech in marathi.

व सोबतच या लेखाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी भाषण पीडीएफ सुद्धा दिलेली आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकता.dr babasaheb ambedkar speech in marathi pdf.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी 2022 | dr babasaheb ambedkar speech  in marathi.

dr babasaheb ambedkar speech  in marathi.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण Dr babasaheb ambedkar jayanti 2024 speech in marathi | dr babasaheb ambedkar bhashan marathi.


मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,


शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,


अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,


माझे शत शत नमन आहे त्यांच्या चरणीबाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू या गावी झाला हे सर्वांनाच माहिती आहे यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती साजरी होत आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे कोकणातले असले तरी ते बाबासाहेबांच्या जन्माच्या वेळी ते मध्य प्रदेशातील बहु या गावी होते.

त्यावेळी बाबासाहेबांचे वडील लष्करी छावणीमध्ये  ७व्या पलटणी सुभेदार या पदावर कार्यरत मध्ये होते. बाबासाहेबांच्या आईचे नाव भिमाबाई होते. भिमरावाचा जन्माच्या आधी भीमाबाईला 13 अपत्ते झाली होती.भीमराव चौदावे रत्न होते.


मालोजीराव भीमरावाचे आजोबा होते त्यांचा धाकटा बंधू हा संन्यास घेऊन घराबाहेर पडले होते. एकदा ते अचानक घरी आले असताना त्यांनी सांगितले  की,आपल्या तिसऱ्या पिढीचा एक उद्धार कर्ता पुरुष जन्माला येईल व तो तिसऱ्या पिढीचा उद्धार करेल आपल्या कुळाचे नाव सर्वत्र गाजवेल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती.


भीमराव ची आई लहानपणीच मरण पावली होती. भीमराव त्यांच्या आईला बये असे. त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्याने म्हणजेच मीराआत्याने केला. त्यांना आईची कधी कमी वाटू दिली नाही.

भीमराव चे बालपण अत्यंत लाडात गेले मग शिक्षणाला सुरुवात झाली शिक्षणात ते अत्यंत हुशार होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले त्यानंतर इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. लहानपणीच त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले होते.

 1907 मध्ये भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी काही लोकांनी भीमरावांचा सत्कार करण्याचे ठरविले.या सत्काराच्या वेळी केळूसकर गुरुजींनी बुद्ध चरित्र हे पुस्तक बाबासाहेबांना भेट दिले. व तेव्हापासूनच बुद्धांची ओळख भीमरावाला झाली.

त्यानंतर भीमरावाचे लग्न रमाबाई सोबत झाले. भीमरावाचे शिक्षण चालूच होते. 12-12-1912 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे बी.ए झाले. व यशवंता चा जन्म याच वर्षी झाला.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जुलै 1913 मध्ये उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेले. त्यावेळेस त्यांनी सर्व शक्ती एकवटून अभ्यासाला सुरुवात केली.


अठरा-अठरा तास अभ्यास केला खूप भूक लागली तरीही ते दोन पाव व एक कप कॉफी पिऊन आपली भूक भागवत असत. त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली.

दोन जून 1915 ला एम. ए ची पदवी त्यांना मिळाली. जून 1916 मध्ये पीएचडी साठी शोध निबंध सादर केला. व तो एप्रिल 1925 मध्ये शोधनिबंध ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात आला व त्यांना  PhD पीएचडीची पदवी मिळाली.

अमेरिकेत असतांना त्यांनी स्वतः उपाशी राहून त्यांनी दोन हजार (२०००) ग्रंथ विकत घेतले. अशारीतीने अमेरिकेतील हा अभ्यासक्रम पूर्ण संपवून ते जुलै 1916 ला भारतात परत आले.
बाबासाहेबांना पीएचडीची पदवी मिळाली तरीही त्यांची शिक्षणाची भूक शमली नव्हती. त्यांना डॉक्टरेट व बॅरिस्टर ही पदवी मिळवण्याची  प्रखर इच्छा होती.


त्यासाठी त्यांनी बडोदा संस्थानात पुन्हा दोन वर्षाची स्कॉलरशिप मिळावी म्हणून अर्ज केला व त्यासोबतच त्यांचे प्राध्यापक सेलिग्मन यांचे शिफारस पत्र ही जोडले होते. त्यानंतर त्यांना एक वर्षाची स्कॉलरशिप मिळाली व पुन्हा  नोव्हेंबर 1916 लंडनला बार एट लॉ साठी त्यांना ग्रेज इन मध्ये प्रवेश मिळाला.

व त्यांच्या प्राध्यापक सेलिग्मन यांनी शिफारस पत्र मध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर या अत्यंत हुशार चांगले गुणी कर्तबगार विद्यार्थी असल्याचे प्रमाणपत्र दिले असल्यामुळे त्यांना लंडन विद्यापीठातून 1 डिसेंबर 1916 एम एस सी च्या परीक्षेत बसण्याची संधी मिळाली.

बाबासाहेब अत्यंत मेहनत करून आपले शिक्षण घेत होते व एक दिवस बाबासाहेबांना बडोद्या तून पत्र आले की तुमच्या स्कॉलरशिप चा काळ संपला आहे तेव्हा तुम्ही भारतात परत या.
हे पत्र वाचल्यावर बाबासाहेबांना धक्काच बसला. पण खचून न जाता राहिलेला अभ्यासक्रम ऑक्टोबर 1917 पासून सुरू करण्यासाठी त्यांनी लंडन विद्यापीठाकडून अनुमती घेतली. व आग बोटीने बाबासाहेब 21 ऑगस्ट 1917 ला मुंबईत वापस आले.

तेव्हा त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. पण बाबासाहेबांनी अशाही परिस्थितीत अभ्यास सुरूच ठेवला. व वाणिज्य कॉलेज व शिकवणी सुरू केली.

त्यानंतर बाबासाहेबांना अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून सिडमहॅम या महाविद्यालयात नोकरी मिळाली.

1 नोव्हेंबर 1918 ते  11 मार्च 1920 या काळात एवढ्या विद्वान प्राध्यापकाला त्यांनी अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र नीतिशास्त्र मानवशास्त्र इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांनी ज्ञान संपादन केली होते. व ते जागतिक दर्जाचे महान विद्वान होते. इथेही अस्पृश्यतेचे चटके बसू लागले.

तेथील तरुणांना वाटले की महारांचा प्राध्यापक काय शिकवणार?. त्यांचा पोषाख बघून मुले अगदी स्तब्ध राहिली व त्यांची शिकवण्याची पद्धत,त्यांची ज्ञान प्रज्ञा व त्यांच्या डोक्यातील सखोल विचार बघून मुले अगदी दिपून गेले. बाहेर बसलेली मुलं इतर क्लासचे मुलंसुद्धा त्यांच्या व्याख्यानाला येऊन बसत.

त्यांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली होती.ते मित्रत्वाच्या भावनेने विद्यार्थ्यांना समजून सांगायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सूट बूट टाय कोट मधले त्या काळातले पहिले प्राध्यापक होते.
यानंतर राहिलेल्या अभ्यास क्रम पूर्ण करण्याकरिता ते पुन्हा लंडनला 1920 जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला रवाना झाले. व त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली

लायब्ररीमध्ये अभ्यासासाठी सर्वांच्या अगोदर ते जात असे व संध्याकाळी सर्वांच्या शेवटी ते लायब्ररीतून बाहेर पडत असे.दिवसभर पोटाची भूक मारून अभ्यास करीत असत व रात्री घरी आल्यावर पुन्हा एक कप दूध व दोन बिस्किटे खाऊन पुन्हा अभ्यासाला सुरुवात करीत असत.

अशाप्रकारे अखंड तपश्चर्या अभ्यासासाठी बाबासाहेबांनी केली. जीवन 1921 मध्ये एम एस सी ची पदवी त्यांना मिळाली. 28 जून 1922 बॅरिस्टर पदवी ने त्यांना सन्मानित करण्यात आले.

1922 च्या सुरुवातीलाच प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा प्रबंध विद्यापीठाला त्यांनी सादर केला.1923 ला तो प्रबंध मान्य झाला व डिसेंबर 1923 ला डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांना विद्यापीठाने प्रदान केली.

1923 या काळात लंडन चा अभ्यासक्रम त्यांनी  पूर्ण केला. व 14 एप्रिल 1923 ला भारतात परत आले. बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीज. हा ग्रंथ इंग्लंडमधील पीएस किंग अँड कंपनी या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला.बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ आपल्या माता-पित्यांना अर्पण केला.
उच्चविद्याविभूषित झाल्यानंतर बाबासाहेबांनी सार्वजनिक जीवना ला सुरुवात केली. यानंतर त्यांनी मानवाच्या हक्कासाठी अनेक प्रकारची सत्याग्रह केले.

चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन,काळाराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह, पुणे करार, हिंदू कोड बिल तयार केले. व हिंदू कोड बिलाच्या मान्यता न मिळाल्यामुळे कायदेमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिला. अशाप्रकारे राजीनामा देणारे ते पहिलेच महापुरुष होते.

सर्व भारतीय महिलांचे उद्धारकर्त बाबासाहेबच आहे. स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा नेता  बाबासाहेबच आहे. कामगार वर्गाचे उद्धारक, शेतकरी, शेतमजुरांचे उद्धारक कर्मचाऱ्यांना घटनेत त्यांनी आरक्षण दिले.
भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारतीयांना घटनेच्या माध्यमातून सर्व हक्क अधिकार दिले.

भारताची अर्थव्यवस्था मजबूत व सुदृढ व्हावी म्हणून भारतीय रिझर्व बँकेची स्थापना केली व अखंड भारत राहावा म्हणून त्यांनी सर्व भारतीयांना एक सूत्रात बांधून ठेवले.

बाबासाहेबांचे कार्य महान आहे त्यांचे कितीही गुणगान केले तरी शब्द अपुरे पडतात पण त्यांचे कार्य संपणार नाही देशातील सर्व जनतेसाठी प्राण असेपर्यंत कार्य करणारे जगातील एकमेव व्यक्तिमत्व बाबासाहेब आहे.

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मिळवून दिला. मानवाचा कल्याणासाठी संपूर्ण आयुष्यभर बाबासाहेबांनी प्राण पणाला लावला.स्वतःचा संसार विसरणारे पत्नी-मुले विसरणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर.

 अशा या देशभक्त राष्ट्र निर्माण कर्त्यास . विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व प्रज्ञासूर्य महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा बहाल करते.
माझ्या भाषणाला इथेच पूर्णविराम देते जय भीम जय भारत.

लिखिका.

सौ. प्रतिभाताई पाटील,यवतमाळ


तर हे होते बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी. तुम्हाला जर हे भाषण आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण हे babasaheb ambedkar jayanti 2023 speech in marathi | dr babasaheb ambedkar bhashan marathi आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना त्या माहितीचा वापर करता येईल. 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित विचारले जाणारे प्रश्न.

Q1.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भिमाबाई होते.


Q2.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू इथे झाला.


Q3.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर असे होते. तर दुसऱ्या पत्नीचे नाव सविता आंबेडकर असे होते.


Q4.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला.
टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या