गुरुपौर्णिमा भाषण मराठी 2023 | guru purnima bhashan in marathi | guru purnima speech in marathi.

गुरुपौर्णिमा भाषण मराठी 2023 | guru purnima bhashan in marathi | guru purnima speech in marathi pdf

guru purnima speech in marathi:नमस्कार आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा ही दरवर्षी आपल्या गुरुप्रती असणाऱ्या आदरभाव व्यक्त करण्यासाठी व व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी करतात या वर्षी म्हणजेच 2023 ला  3 जुलै रोजी आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.


गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये भाषण guru purnima bhashan स्पर्धा आयोजित केली जाते त्यासाठी अनेक विद्यार्थी गुरूपौर्णिमा भाषा हे शोधत असतात. त्या अशा अनेक विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही गुरुपौर्णिमे वर अतिशय सुंदर असे भाषण लेखन guru purnima speech in marathi तयार केलेले आहे.


हे भाषण तुम्ही नक्की शेवटपर्यंत वाचा.या भाषणामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. गुरुपौर्णिमा मराठी भाषण. सर्व विद्यार्थी म्हणजेच लहानपासून ते मोठ्यापर्यंत असे विद्यार्थी आपल्या भाषणामध्ये याचा करू शकता.तर चला मग बघू या गुरुपौर्णिमा भाषण मराठीमध्ये.


गुरुपौर्णिमा भाषण मराठी लेखन | guru purnima speech in marathi pdf | guru purnima bhashan in marathi.

गुरुपौर्णिमा भाषण मराठी 2022 | guru purnima bhashan in marathi | guru purnima speech in marathi.
guru purnima bhashan in marathi guru purnima speech in marathi.



गुरू हा आमचा
मार्गदाता खरा.
ज्ञानीयाचा झरा - अखंडित.
काढुनी टाकती
मनातला दोष.
करी उपदेश- बहुमूल्य.
गुरु देत असे
जीवना आकार
करती उद्धार- माणसाचा.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंचा गौरव गुरु साक्षात परब्रह्म अशाप्रकारे केला जातो.ज्ञानाचे क्षेत्र कोणतेही असो ते साध्य करण्यासाठी प्रत्येकाला गुरु ची आवश्यकता असते. म्हणजेच कोणती कला व ज्ञान अवगत करण्यासाठी  गुरू हवाच.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरुशिष्य परंपरा फार प्राचीन काळापासून आपल्याला बघावयास मिळते. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे. गुरु आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात.

त्यामुळे दरवर्षी आषाढी पौर्णिमेला गुरू विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा भारताबरोबरच जगामध्ये गुरुपौर्णिमा साजरा करण्यात येते. या दिवशी सर्व विद्यार्थी आपापल्या शिक्षकाबद्दल कृतज्ञतेचा भाव त्यांच्याविषयीचा आदर त्यांना फुले बुके इत्यादी वस्तू देऊन आणि त्यांचा आशिर्वाद घेऊन व्यक्त करतात.

खोजत खोजत सतगुरु पायो,

भूरिभाग्य जाग्यो शिष आयो।

देखत दृष्टि भयो आनंदा,
यह तो कृपा करी गोविंदा।।

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर:
गुरु: साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम:


गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते कारण या दिवशी महर्षी व्यास या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.ज्याला व्यासपौर्णिमा असेसुद्धा म्हटले जाते.guru purnima bhashan in marathi.


माणूस हा सर्व प्राणिमात्रांमध्ये श्रेष्ठ समजला जातो कारण माणसाजवळ विद्या आहे. ती विद्या देण्याचे काम गुरुच करतात. इतर प्राणी पक्षी यांच्याशी तुलना केली  तर माणसाचे बाळ हे जास्त परावलंबी असते. त्याला चालायला बोलायला आणि  खायला कोणीतरी दुसरे शिकवत असते.


सामान्यतः आई आपल्या बालकाची सर्वात पहिलीे गुरू असते. तिच्या कडून तो बालक सर्व गोष्टी शिकत असतात. म्हणूनच म्हणतात की

माता माझी गुरु माता माझा कल्पतरु.

ज्याप्रमाणे आपला पहिला गुरु आई याचे महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे.त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे  आपले गुरु म्हणजे शिक्षक यांचे सुद्धा आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे खूप महत्त्व आहे. म्हणूनच शाळेतील शिक्षकांना आपले दुसरे गुरु असे म्हटले जाते.

शाळेतील शिक्षक ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतात तीच भूमिका शाळेतील शिक्षक पार पाडीत असतात. आई वडील आपल्याला जीवन देतात आणि गुरु शाश्वत ज्ञान व कीर्ती देतात.

गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे तसेच गगना प्रमाणे विशाल आहे आपण त्यांच्याकडे नम्र होऊन ते ज्ञान कण वेचले पाहिजेत कारण गुरुविण कोण दाखविल वाट.

गुरुविना ज्ञान प्राप्ती नाही असे भागवत धर्मियांत गुरूंना असामान्य महत्त्व आहे.आपल्याला जे काय करावे ते घेणारा गुरु हा कल्पतरु आहे अशी त्यांची धारणा होती.

म्हणूनच प्रकांडपंडित असलेल्या चांगदेव महाराजांनी मुक्ताई ला आपला गुरु मानले.देवा विण वाव ठाव नाही असा साक्षात्कार विसोबा खेचर यांनी नामदेवांना घडवला होता.वडा भगवंताविषयी त्यांचे अज्ञान दूर केले होते म्हणे संत नामदेवांनी विसोबा खेचर यांना आपले गुरू मानले.

संत रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते अध्यात्म राजकारण शक्ती आणि युक्ती, विक्रम आणि वैराग्य यांची सांगड कशी घालावी हे त्यांनी शिवरायांना शिकवले.

अर्जुनाला शस्त्रविद्या गुरु कडून मिळाली.एकलव्याला ती नाकारली गेली तरी पांडूचा पुतळा उभारून त्याला वंदन करून एकलव्याने साधना केली आणि विद्या मध्ये असामान्य असे यश मिळवले.

असे भारतीय संस्कृतीमध्ये असंख्य असे  उदाहरण गुरू-शिष्याचे  आपल्याला बघावयास मिळते. आणि यावरून आपल्याला गुरुची महती त्यांचे असामान्य महत्त्व दिसून येते.

आपल्या गुरुंचे आपल्यावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो गुरु प्रमाणे शिष्य घडत असतो म्हणून आपणआपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करायला हवे त्यांच्या शब्दांचा आदरकरायला हवा.


गुरूला जातीचे वयाचे बंधन नसते तर.आपल्याला शिकवणारी प्रत्येक गोष्ट ही आपली गुरूच असते.आपल्या जीवनात गुरूंची नानाविध रूपे आपणास पाहायला मिळतात.आत्ताच्या काळात नवीन शिक्षण पद्धती आलेली आहे काळ बदललेला आहे तरीपण जुन्या काळापासून चालत आलेली गुरु-शिष्याचे नाते आजही पवित्र आहे व सुरू आहे.

गुरु हा व्यक्तीच्या जीवनातील फार मोठा ठेवा असतो त्याची निष्ठा असते, श्रद्धा असते, स्फूर्ती ही असते ती सन्मार्गाला नेणारी  असते.

गुरूचे ज्ञान आहे अमर्याद ज्ञान असते. हेच ज्ञान आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू हाच गुरु ऋण फेडण्याचा मार्ग आहे

म्हणूनच आपण आपल्या गुरुविषयी आदर बाळगणे त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे.

स्वप्नांना बघायला वास्तव डोळे लागतात
स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते
यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात
त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरु आशीर्वाद लागतात आषाढपौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


तर हे होते गुरुपौर्णिमा २०२२ यावर भाषण मराठीमध्ये guru Purnima bhashan.  guru Purnima marathi bhashan आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे भाषण आवडले असेल. मला जर हे भाषण आवडले असेल व याबद्दल आणखी काही विचारायचे असेल. खाली. कमेंट मध्ये नक्की विचारा.

guru purnima speech in marathi pdf for student teacher download करण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला नक्की जॉईन करा.

Guru purnima speech in Marathi., Guru purnima Short speech in Marathi.हे भाषण आपके आपले मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचे सुद्धा मदत होईल. पुन्हा एकदा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद.

FAQs:

गुरुपौर्णिमा यावर्षी कधी आहे.
गुरुपौर्णिमा 3 जुलै 2023 ला आहे.

गुरुपौर्णिमा म्हणजे काय?
आपल्या गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांच्याविषयी आदर बाळगण्याचा म्हणजे गुरुपौर्णिमा होय.

गुरुपौर्णिमेचे इतर नाव कोणते?
गुरुपौर्णिमेला आषाढी पौर्णिमा व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या