रक्षाबंधन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Raksha Bandhan in Marathi | 10 lines Essay on Raksha Bandhan in marathi 2024

 रक्षाबंधन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Raksha Bandhan in Marathi |  10 lines Essay on Raksha Bandhan in marathi 2024

Essay on Raksha Bandhan in marathi:भारत हा देश सणांचा देश म्हणून ओळखला जातो. श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो.नागपंचमी नंतर रक्षाबंधन हा दुसरा महत्त्वाचा सण आहे.

दरवर्षी रक्षाबंधन संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.आजच्या या निबंधा मध्ये आम्ही तुमच्या साठी रक्षाबंधन वर दहा ओळी निबंध घेऊन आलेलो आहोत.तर चला मग बघू या  रक्षाबंधन निबंध मराठी 10 ओळी.

रक्षाबंधन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Raksha Bandhan in Marathi | 10 lines Essay on Raksha Bandhan in marathi 2022
रक्षाबंधन निबंध मराठी 10 ओळी  10 lines Essay on Raksha Bandhan in marathi 


रक्षाबंधन वर 10 ओळी चा निबंध | Raksha Bandhan nibandh in Marathi 10 lines.

1.श्रावण महिना  हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो.

2.रक्षाबंधन हा श्रावण महिन्यामध्ये येणारा महत्त्वाचा सण आहे.

3.हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो.

4.या पौर्णिमेला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात.

5.रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आणि प्रेमाचा सण आहे.

6.या दिवशी बहिण आपल्या भावाची ओवाळणी करते. आणि त्याच्या मनगटावर राखी बांधते.

7.या नंतर बहीण आपल्या भावा ला मिठाई भरवते.आणि
त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते.

8.भाऊ आपल्या बहिणीला तिच्या आवडी प्रमाणे भेटवस्तू देतो.

9.रक्षाबंधन या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची व  उज्वल भविष्याची जबाबदारी घेतो.

10.या दिवशी सगळीकडे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते.

रक्षाबंधन निबंध मराठी 10 ओळी | Raksha Bandhan nibandh in Marathi 10 lines

 1. रक्षाबंधन हा सण भारतातील पारंपारिक प्राचीन काळापासून चालत आलेला आहे.
 2. दरवर्षी  हा सण ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो.
 3. रक्षाबंधन या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
 4. रक्षाबंधन हा सण बहिण-भावाचा सण म्हणून ओळखला जातो.
 5. हा सण बहिण भावातील नाते दृढ करणारा.व त्याच्या मधील पवित्र नात्याचा सण आहे.
 6. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून अाेवाळते.
 7. भावाचे शत्रूपासून रक्षण व्हावे आणि त्याला दीर्घायुष्य लाभावे.अशी बहिण प्रार्थना करते.
 8. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.आणि तिच्या  रक्षणाची जबाबदारी घेत असतो.
 9. हा सण परिवारातील सर्व सदस्य एकत्र मिळून मोठ्या आनंदाने साजरा करतात.
 10. या दिवशी सगळीकडे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते.आणि या दिवशी घरोघरी नारळी भात केला जातो.

तर हा होता रक्षाबंधन वर मराठी निबंध दहा ओळी मध्ये.
तुम्ही दरवर्षी रक्षाबंधन हा सण कसा साजरा करता हे कळण्याकरिता खाली कमेंट मध्ये सांगा.

10 line essay on Raksha Bandhan in Marathi. हा तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी कमेंट करा.
Raksha Bandhan nibandh in Marathi आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या