माझी आवडती मैत्रीण निबंध | majhi aavadti maitrin nibandh in marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आज आपण मैत्रिणी वर निबंध म्हणजेच माझी आवडती मैत्रीण निबंध majhi aavadti maitrin nibandh in marathi बघणार आहोत. या निबंधामध्ये एक मैत्रिणीची  वर्णन केलेले आहे. हा निबंध वर्ग पाच ते दहा चे विद्यार्थी आपल्याअभ्यासासाठी वापरू शकता तर चला मग सुरु करूया माझी मैत्रीण निबंध मराठी .

माझी आवडती मैत्रीण निबंध | majhi aavadti maitrin nibandh in marathi |majhi aavadti maitrin essay in marathi
 माझी आवडती मैत्रीण निबंध | majhi aavadti maitrin nibandh  

माझी आवडती मैत्रीण निबंध | majhi aavadti maitrin nibandh in marathi

majhi aavadti maitrin essay in marathi : एक चांगलं पुस्तक एका चांगल्या मित्राच्या बरोबर आहे. पण एक चांगला मित्र एका अभ्यासिकेच्या बरोबर आहे खरोखरच हा सुविचार किती सत्य ठरतो.

एक चांगला मित्र /मैत्रिणी खरंच आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी शिकवते. आपल्या सुख-दुःखात सहभागी होऊन आपल्याला योग्य सल्ला देते. असेच मलाही एक जीवाभावाची मैत्रीण आहे.

तिचे नाव कांता आणि आम्ही दोघी इयत्ता दुसरी पासून सोबत शाळा शिकत आहे. कांता ही शांत मुलगी आहे. ती ती बघायला अतिशय देखणी मुलगी आहे.ती अभ्यासात सुद्धा फार हुशार आहे,आम्ही दोघी रोज सोबत पाईपाई शाळेत जातो.

एकदा मॅडम कांता ला माझ्या पासुन थोडे दूर दुसऱ्या बाकावर बसवले तेव्हा तिने मॅडम ला माझ्याजवळ बसण्यासाठी किती विनवणी केली. हे मला आजही आठवते.त्यावेळेस मॅडमला किती विनवणी मान्य करावी लागली.तेव्हापासून आम्ही दोघी वर्गामध्ये एकाच बाकावर बसतो. या प्रसंगाने कांता नी माझी मैत्री अधिकच घट्ट झाली.

कांताचे घर माझ्या घरापासून थोडे लांबच आहे.माझा कांता वर फार विश्वास व स्नेह आहे व तिचा सुद्धा तेवढाच विश्वास व स्नेह माझ्यावर आहे.मी जर का कधी शाळेत गेली नाही तर कांताला सुद्धा शाळेत करमत नाही ती दिवसभर शाळेत गुमसूम शांत बसून राहते मात्र ज्या दिवशी आम्ही दोघी शाळेत जातो तेव्हा आम्ही दोघी फार आनंदी असतो आणि खूप मज्जा करीत असतो.

सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघी बाहेर उद्यानात जात असतो. तिथे आम्ही विविध प्रकारचे खेळ खेळत असतो,थोडा वेळ खेळून झाल्यावर आम्ही आमचा घरचा अभ्यास पूर्ण करतो.

कांता मला अभ्यासात फार मदत करते. ती इतर विषयाप्रमाणे गणितात सुद्धा फार हुशार आहे. गणित आणि इंग्रजी हा तिचा खूप आवडीचा विषय आहे.

मला कोणत्याही प्रमेयात किंवा उदाहरणात जर काही अडचण असली तर मी तिच्याकडेच जाते. वती ती माझी अडचण क्षणात सोडवून देते.त्याच प्रमाणे जेव्हा कधी मला जीवनात ही कधीही अडचण येते तेव्हा मी सर्वप्रथम तिलाच सांगते व ती मला योग्य तो सल्ला देऊन माझे समाधान करत असते.

कांता ही माझी सर्वात जवळची लाडकी मैत्रिण आहे. ती अभ्यासात हुशार आणि दिसण्यास सुंदर तर आहेच. पण त्याच सोबत ती कलासंपन्न सुद्धा आहे.ती नृत्य कलेत निपुण आहे,ती फार सुंदर नृत्य करते तिला चित्रही फार छान काढता येते तीचा राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला होता. ती कविता सुन्दर करते मागील दिवाळी अंकात तिची एक कविताही प्रदर्शित झाली होती.तेव्हा मी व कांता सर्वात जास्त आनंदित होतो.

कांताचे वडील हे बँक कर्मचारी आहे.आम्ही दोघी ही मध्यम परिवारातील आहो कांता च्या घरी कधीही कोणताही काही कार्यक्रम असला कोणताही आनंदाचा प्रसंग असला तर ती मला नेहमीच बोलावते मीसुद्धा तिच्या मदतीला नेहमीच तयार असते.

माझ्या घरी सुद्धा काही प्रसंग असला तर मला सर्वात प्रथम कांताचेच नाव आठवते कांता माझीच नाहीतर माझ्या घरात सर्वांची लाडकी आहे. माझ्या आईला कांताचा शांत मनमिळावू प्रेमळ स्वभाव फार आवडतो.

कधी कधी करता माझ्या आईला घरकामात सुद्धा मदत करते माझ्या घरचा पाळीव कुत्रा येणारा जाण्यावर सर्वांवरच भुंकतो पण तो कांता वर कधीच भुंकत नाही व तिला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही.

माझी आणि कांताची मैत्री फार निराळी आहे. आमच्या मैत्रीमध्ये प्रेम विश्वास व आपुलकी आहे. आम्ही एकमेकांना नेहमी सहकार्य करतो आम्ही एकमेकींच्या नेहमी पाठीशी उभ्या असतो. आणि असेच एकमेकींच्या पाठीशी आम्ही नेहमी राहू असा मला विश्वास आहे. आमच्या मैत्रीचे नातं कधी तुटणार नाही याची मला खात्री आहे.

तर मित्रांनो  हा होता माझी आवडती मैत्रीण निबंध |majhi aavadti maitrin nibandh in marathi जर तुम्हाला   majhi aavadti maitrin essay in marathi हा निबंध कसा वाटला हे हे कळवण्यासाठी  खाली कमेंट करा  आणि माझी आवडती मैत्रीण निबंध हा निबंध आपल्या मित्रांबरोबर सोशल मीडियावर शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा मदत होईल धन्यवाद.

Read More

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या