वृक्षारोपण कार्यक्रम बातमी लेखन मराठी | vriksharopan batmi lekhan in marathi

vriksharopan batmi lekhan in marathi नमस्कार मित्रांनो बातमी लेखन मराठी या प्रकारांमधील आज आपण एक बातमी तयार करणार आहोत.ती बातमी म्हणजे वृक्षारोपण कार्यक्रम बातमी लेखन मराठी वर केलेली बातमी आहे या बातमी लेखनात तुम्हाला तुमच्या शाळेत किंवा इतर ठिकाणी झालेल्या वृक्षारोपणाची बातमी तयार तयार करायला सांगितले जाईल किंवा शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा झाला यावर बातमी लेखन तयार करा असा प्रश्न दिला जाईल तर त्यावर तुम्हाला बातमी लेखन तयार करायचे आहे तर चला मग बघूया वृक्षारोपण कार्यक्रम बातमी लेखन मराठी.

वृक्षारोपण कार्यक्रम बातमी लेखन मराठी | vriksharopan batmi lekhan in marathi
वृक्षारोपण कार्यक्रम बातमी लेखन मराठी | vriksharopan batmi lekhan in marathi

वृक्षारोपण कार्यक्रम बातमी लेखन मराठी | vriksharopan batmi lekhan in marathi

शिवाजी महाविद्यालयात वृक्षारोपणाचा भव्य सोहळा साजरा
पुणे ता 3 नोव्हेंबर (आमच्य वार्ताहराकडून)

   पुणे येथील श्री शिवाजी महाविद्यालया मध्ये 12 नोव्हेंबर 201 ला सकाळी नऊ वाजता वृक्षारोपणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.या वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध निसर्गप्रेमी माननीय श्री जीवन राऊत यांना बोलावण्यात आले होते.त्यांचे स्वागत विद्यालयाचे माननीय    मुख्याध्यापक श्री एस.डफळे सर यांनी शाल श्रीफळ आणि सोबतच पुष्पगुच्छ देऊन केले.

वृक्षारोपणाचा कार्यक्रम विद्यालयाच्या जवळील नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शिक्षक विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांची लक्षणीय उपस्थिती बघण्यास मिळाली.कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी व तयारीसर्व शिक्षक गण तसेच वर्ग 8 ते 10 च्या विद्यार्थी यांनी पार पाडली.वृक्षारोपण कार्यक्रमासाठी जवळच्या नर्सरीतून विविध प्रकारचे झाडे मागवण्यात आली होती.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच मुख्याध्यापक यांनी लाल रिबीन कापून व नारळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपल्या हाताने एका झाडाचे रोपण केले. आणि सोबतच शाळेच्या मुख्याध्यापकांनी यांनी सुद्धा एका वृक्षाचे रोपण केले.

यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मैदानात रोपांची लागवड केली तसेच त्यांना पाणी देऊन त्यांच्या संरक्षणासाठी  रोपांना कठडे बांधण्यात आले.

यानंतर विद्यालयाच्या सभागृहामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी झाडाचे महत्व आणि पर्यावरणामध्ये झाडाचे अनन्य साधारण महत्व कसे आहे, यावर भाषण दिले त्यांनी भाषणातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सर्वांना दिला. तसेच विद्यालयाचे प्रमुख श्री डफळे सर यांनी सुद्धा झाडाचे महत्व यावर भाषण दिले. आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पणे पार पडला म्हणून सर्वांचे अभिनंदन सुद्धा केले तसेच,प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे अशी सर्वांना त्यांनी विनंती आपल्या भाषणात केली.

विद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षिका प्रिती फडके यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता दुपारी दोन वाजता राष्ट्रगीताने झाली.

तर होते वृक्षारोपण कार्यक्रम बातमी लेखन मराठी मध्ये या बातमी लेखनामध्ये शाळेचे नाव परिसराचे नाव व प्रमुख पाहुणे तसेच मुख्याध्यापक यांचे नाव सुद्धा काल्पनिक आहे.यामध्ये तुम्ही बदल करू नको आपल्या सोयीनुसार बातमी लेखन तयार करू शकता.जर तुम्हालावृक्षारोपण कार्यक्रम बातमी लेखन मराठी | vriksharopan batmi lekhan in marathi ही बातमी लेखन आवडले असेल तर आणि जर काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट नक्की विचारा आम्ही त्याचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करून.आणि हि पोस्ट आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल.

हे सुद्धा वाचा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या