बातमी लेखन मराठी 2021 | batmi lekhan in marathi for class 10th

 नमस्कार मित्रांनो आज आपण (बातमी लेखन मराठी) batmi lekhan in marathi बातमी लेखन हा मराठी उपयोजित लेखन यामधील महत्त्वाचा भाग बघणार आहोत.यामध्ये आपण बातमी लेखन म्हणजे काय? बातमी लेखन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात शेवटी एक नमुना कृती आपण बघणार आहोत तर चला मग बघुया बातमी लेखन.

दहावीच्या परीक्षे मध्ये batmi lekhan in marathi 10th class 2020-2021 दरवर्षी यावर एक प्रश्न असतो

batmi lekhan in marathi,बातमी लेखन मराठी 2021 | batmi lekhan in marathi for class 10th
बातमी लेखन मराठी 2021 | batmi lekhan in marathi for class 10th

प्रस्तावना बातमी लेखन | batmi lekhan in marathi

जसे की आपल्याला माहितीच आहे की सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे तसेच प्रसार माध्यमाचे योग आहे. प्रसारमाध्यमे तंत्रज्ञान व खास करून इंटरनेट द्वारे जग आपल्या खूपच जवळ आलेली आहे.
प्रसारमाध्यमे इंटरनेट द्वारे वर्तमानपत्राद्वारे जगात कुठे काय घडते, जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या गोष्टी ची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. आपल्या जीवनातील संबंधित बातम्या पासून ते राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बातम्या आपल्याला याद्वारे कळतात
माहिती देणे, ज्ञान देणे, तसेच परिस्थितीची जाणीव करून देणे व समाज प्रबोधन करून देणे इत्यादी बातमीचे प्रमुख उद्देश असते.

बातमी म्हणजे काय |batmi lekhan marathi meaning

बातमी ही आजच्या युगात आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण जगामध्ये कोठे काय घडले हे आपल्याला बातमी द्वारे कळते.म्हणूनच वस्तूस्थितीचे चित्रण करणारी बातमी करणे तयार करणे बातमी लेखन करणे हे महत्त्वाचे कौशल्य ठरते.
बातमी घडून गेलेल्या घटनांची, त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याची असते.बातमी मध्ये आपल्याला काय घडले कधी घडले कुठे घडले कोण कोण उपस्थित होते इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळतात ती म्हणजे बातमी.
बातमी लेखन ना मध्ये जसे घडले तसे यथातत्य वर्णन करायला हवे. अशा प्रकारे बातमी चे वर्णन केले जाते.
याचबरोबर बातमी म्हणजे काय याची आपल्याला थोडक्यात कल्पना आलीच असेल.

बातमी लेखनाचे स्वरूप | batmi lekhan in marathi format|बातमी लेखन मराठी format.

1.मथळा शीर्षक

मथळा म्हणजे बातमीचे शीर्षक (मुख्य शीर्षक) सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे हेडलाईन.बातमीचे शीर्षक आकर्षक असावे जेणेकरून वाचणाऱ्या मध्ये बातमी विषयी कुतूहल निर्माण होईल.
बातमी स्त्रोत
बातमीचा मथळा झाल्यानंतर आपल्याला बातमीचा स्त्रोत लिहायचा असतो जसे की बातमी ही कोणाकडून घेतलेली आहे. त्याचे उगम काय आहे म्हणजेच आपण जसे लिहितो की आमच्या वार्ताहर कडून या प्रमाणे
2.स्थळ दिनांक
बातमी ही नेमकी  कोठे घडली याची माहिती मिळण्याकरिता बातमीमध्ये स्थळ लिहिणे आवश्यक आहे.
दिनांक यामध्ये आपण बातमी ज्या दिवशी घडली त्या दिवसानंतरची 2री तारीख लिहितो परंतु यामध्ये बातमी ज्या दिवशी घडली ती तारीख नमूद करणे आवश्यक असते.

3.बातमीचा शिरोभाग
बातमीचा शिरोभाग अत्यंत महत्त्वाचा भाग असतो यामध्ये पहिल्या दोन ते तीन ओळी मध्ये बातमीचे महत्त्वाचा भाग सांगितलेला जातो. या पहिले दोन ते तीन ओळी मध्ये जे सांगितले जाते त्यावरूनच  बातमी मध्ये काय आहे हे वाचणाऱ्याला कळायला हवे.
4.बातमीचा तपशील
बातमीचा तपशील म्हणजे बातमी विस्तृतपणे सांगणे व यामध्ये बातमीच्या दिवशी काय घडले हे सांगितले जाते. जसे की प्रमुख पाहुणे कोण होते. कार्यक्रमाची रूपरेषा काय होती. प्रमुख पाहुण्यांनी केलेले मार्गदर्शन इत्यादी. बातमीचा संपूर्ण संदर्भ यामध्ये दिलेला असतो.


आता आपण बघूया बातमी लेखन मराठी कृती पत्रिकेतील प्रश्न व गुण

बातमी लेखन हा प्रश्न कृतीपत्रिका मध्ये प्रश्न पाचवा आ मध्ये विचारलेला असतो. प्रश्न पाचवा मध्ये तीन कृती दिल्या जातात

आपल्याला या तीन कृती पैकी एक कृती सोडावी लागते यापैकी बातमी लेखनास पाच गुण दिले जातात.बातमी लेखनाची शब्दमर्यादा ही 50 ते 100 शब्दा पर्यंत असू शकते.बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्र यांच्या सहाय्याने दिले जाते.

बातमी लेखन मराठी  तयार  batmi lekhan in marathi  करणे मूल्यमापन कृती 

  1. दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे
  2. दिलेल्या सूचक शब्दावरून बातमी तयार करणे
  3. कार्यक्रमाची बातमी तयार करणे

बातमी लेखनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी 

  1. कौशल्य भाषेचे उत्तम ज्ञान
  2. व्याकरणाचे ज्ञान
  3. सोपी सुटसुटीत
  4. वाक्यरचना


बातमीचे क्षेत्र

बातमीचे क्षेत्र या प्रकारे असू शकतील

सांस्कृतिक क्षेत्र क्रीडा क्षेत्र राजकीय क्षेत्र शालेय शिक्षण सामाजिक अवार्ड वाहिनी वैद्यकीय वैज्ञानिक  दैनंदिन या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात.

बातमी लेखन मराठी  उदाहरण | batmi lekhan in marathi examples

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी केलेले श्रमदान शिबिर या वर बातमी लेखन प्रसिद्ध करा


          गाव करील ते राव काय करील?
मुंबई दिनांक 27 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबई येथील शिवाजी शाळेमध्ये 100 विद्यार्थ्यांनी काल श्रमदान केले विद्यालयातील क्रीडा शिक्षक वैशू परशुराम यांनी शिबिराचे नेतृत्व केले.शिबिराचा कार्यक्रम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री अजमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता.या विभागाच्या कामगारांनी विद्यार्थ्यांना मदत केली व सर्व अवजारे व साहित्य पुरवले.
हे शिबिर म्हणजे सहकाराने मोठी कामे कशी सहज करू होऊ शकतात याचे उत्तम पुरावा आहे.म गावाकडे जाणारा रस्ता  खराब झाला होता श्रमदानातून हा रस्ता तयार करण्यात आला.
संध्याकाळी शिबिराचा समारोप करण्यासाठी आचार्य स्वतः आले होते त्यांनी विद्यार्थ्यांना शाबासकी दिली व नंतर श्रमपरिहारची मेजवानी होऊन ,कार्यक्रम संपला विद्यार्थ्यांना आपल्या कर्तुत्वाचा नवा साक्षात्कार झाला.

batmi lekhan in marathi on plastic bandi

batmi lekhan in marathi on teachers day

batmi lekhan in marathi on marathi divas

वर दिलेल्या प्रश्न वरती लवकरच उदाहरणे टाकण्यात येईल कृपया ब्लॉग ल फॉलो करा.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या